Sheli Palan Shed Yojana | शरद पवार ग्रामसमृद्धी योजना | शेळी पालन शेड अनुदान योजना | गाय गोठा अनुदान योजना | गाय म्हैस गोठा अनुदान योजना फॉर्म कसा भरावा ?

Sheli Palan Shed Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत शासनाची मान्यता मिळाली आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 4 वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना व शेत मजुरांना देण्यात येणार आहे. तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत योजनेसाठी 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे.

Sheli Palan Shed Yojana

तसेच आपण या योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात अर्ज आपल्याला कुठे उपलब्ध होईल. त्याचबरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे, पात्रता, व अटी,शर्ती सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहो.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबवली जात असून. यामध्ये गाई म्हैस पालन साठी पक्का गोठा बांधणे व शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड, व भू-संजीवनी नाडेप कंपोस्ट या ४ वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

100% टक्के अनुदानावर इच्छुक व्यक्तींनी अआपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. चार वैयक्तिक लाभाच्या योजनेचा नवीन समावेश करण्यात आलेला आहे. ते कोणते खाली आपण पाहू शकता.

 1.  गाय/म्हैस या करिता पक्का गोठा अनुदान योजना 
 2.  शेली पालन शेड बांधने अनुदान योजना 
 3.  कुक्कुटपालन शेड बांधने  अनुदान योजना
 4.  भूसंजीवणी नाडेप कंपोस्टिंग

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना

 • अकुशल खर्च :- रु. 6,१८८/- (प्रमाण ८ टक्के)
 • कुशल खर्च :- रु. ७१,०००/-(प्रमाण ९२ टक्के)
 • एकूण खर्च  :- रु. ७७,१८८/-( एकूण प्रमाण १०० टक्के )

📑 हे पण वाचा :- Mazi Kanya Bhagyashree Yojana | माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 सुरु मुलींना 1.46 लाख रु.

शेळी पालन शेड अनुदान योजना

 • अकुशल खर्च – रु. ४,२८४/- ( प्रमाण ८ टक्के) 
 • कुशल  खर्च – रु.४५,०००/- (प्रमाण ९२ टक्के) 
 • एकूण  – रु. ४९,२८४/- ( एकूण प्रमाण १००)

कुक्कुटपालन शेड अनुदान योजना

 • अकुशल खर्च – रु. ४,७६०/-  (प्रमाण १० टक्के)
 • कुशल खर्च – रु.४५,०००/- (प्रमाण ९० टक्के)
 • एकूण  – रु. ४९,७६०/- ( एकूण प्रमाण १००)

भूसंजीवणी नाडेप कंपोस्टिंग:- 

 • अकुशल खर्च – रु. ४,०६४६/- (प्रमाण ३८ टक्के)
 • कुशल खर्च – रु.6,४९१/- (प्रमाण ६२ टक्के) 
 • एकूण -रु. १०,५३७/- (प्रमाण १०० टक्के)

Sharad Pawar Yojana Form Download

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यास शासनाने मंजुरी दिनांक ३ फेबुवारी २०२१ रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी दिली.  योजनेचा शासन निर्णय :- येथे क्लिक करा

जनावरांचा गोठा योजना कागदपत्रे

 • ग्राम सभा ठराव 
 • प्रवर्ग {कोणत्या Cast आहे}
 • नमुना न. ८ किंवा  ७/१२ उतरा
 • अंदाजपत्रक
 • अ.ज./अ.जा./BPL/भूमिहीन/ अल्पभूधारक शेतकरी/अपंग 
 • जनावरांचा गोठा/शेळ्यांचा तपशील (संख्या)
 • यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 
 • प्रस्तावित जागेचा GPS PHOTO(NOTE CAM)
 • उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो 
 • जॉब कार्ड
 • बँक पासबुक 
 • आधार कार्ड 
 • ग्रामपंचायत चे मागणी पत्र 

अर्ज सादर कुठे करावा अर्ज सादर करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये सादर करावयचा आहे.

सर्व कागदपत्रे Download करण्यासाठी येथे क्लिक करा 

योजनाचा शासन निर्णय येथे पहा

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !