Sheli palan yojana 2021 | sheli palan anudan yojana maharashtra 2021

 sheli palan anudan yojana maharashtra 2021

 

आजच्या लेखामध्ये आपण शेळीपालन अनुदान योजनेअंतर्गत 10 शेळ्या व १ बोकड या योजनेसाठी अर्ज कसा करायचा,

योजनेमध्ये पात्रता काय आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

योजनेचे स्वरूप

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या 10 शेळ्या व १ बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य स्थानिक प्रजातीच्या १० मेंढ्या १ नर मेंढा  यांचा गट वाटप करण्यात येणार आहे. तर सुधारित बाबनिहाय  जो खर्च आहेत खालील प्रमाणे पाहणार आहोत.

 

 

10 शेळ्या आणि १  बोकड साठी जर आपण पाहिलं तर शेळी खरेदी साठी प्रती  शेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदासक्षम प्रती शेळी ८ हजार रु.  

तसेच ६ हजार प्रती शेळी अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम,

शेळ्या प्रति शेळी ६ हजार याप्रमाणे 10 शेळी साठी ६० हजार रुपये.

 

प्रती १ बोकड १० हजार रुपये अशा प्रमाणे आपल्याला 10 शेळी बोकड साठी ज्या उस्मानाबादी संगमनेरी बोकड आहेत. १ बोकड १० हजार रुपये तर ज्या अन्य स्थानिक जातीचा बोकड आहे, त्यासाठी ८ हजार रुपये अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बोकड खरेदी साठी दिले जाणार आहेत. तसेच  बोकड यांचा विमा हा तीन वर्षासाठी जर पाहिलं तर १२.७५ अधिक 18 वस्तू सेवा कर यासाठी 13 हजार 545 उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी विमा आहे. अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम शेळ्या साठी जर पाहिले तर १० हजार २३१ एवढा स्थानिक विमा आहे.

शेळ्यांचे व्यवस्थापन चारा खाते यावरील खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करायचा आहे.

 

 

१० मेंढ्या व १ नर मेंढा साठी खालीलप्रमाणे तपशील 

 

 

प्रती मेंढी माडग्याळ जातीच्या त्यासाठी १० हजार रु. तर दहा मेंढ्यांसाठी १ लाख रुपये याप्रमाणे  १ लाख रु. एवढा  खर्च येणार आहे.

8000 प्रती मेंढी अन्य स्थानिक जातीच्या  10 शेळ्या करिता 80 हजार रुपये एवढा खर्च.

 

 

 

माडग्याळ जातीचा १ नर मेंढा १२ हजार रु. तर त्यांचा विमा तीन वर्षासाठी जर पाहिला तर सोळा हजार एकशे पन्नास एवढा विमा आहे.  त्याचबरोबर दखनी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या आहे त्यांच्यासाठी 13 हजार 545 एवढा विमा आहे.

मेंढ्या साठी १ लाख 28 हजार 850 रुपये तर अन्य जातींसाठी पाहिलं तर 87 हजार दोनशे ३० रुपये.

 

 

शेळी मेंढी गट वाटप बाबत योजनेचे स्वरूप/अटी व शर्ती

 

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम,

10 शेळ्या व एक बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व

अन्य स्थानिक प्रजातीच्या १० मेंढ्या गट वाटप करण्यात येणार आहे.

तर शेळी मेंढीच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना राहणार आहे.

योजनेअंतर्गत खोट्या व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी 50 टक्के हिस्सा

राज्य शासनाचा व 50 टक्के हिश्‍श्‍याची रक्कम त्यांनी स्वतः किंवा बँकेकडे कर्ज घेऊन उभारायची आहे.

तसेच सदर योजने मध्ये अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के हिस्सा राज्य

शासनाचा राहील 25 टक्के रक्कम लाभार्थ्यांना स्वतः किंवा बँकेकडे कर्ज घेऊन उभारणी करणे आवश्यक आहे.

 

शेळी मेंढी गटाच्या खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च स्वतः लाभार्थ्यांनी करणे आवश्यक असणार आहे.

शेळी उस्मानाबादी संगमनेरी तसेच अन्य स्थानिक जातींच्या शेळ्यांसाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती प्रवर्गा साठी किती अनुदान आहे.

खालील प्रमाणे आपण पाहणार आहोत.

उस्मानाबादी संगमनेरी शेळी गट साठी सर्वसाधारण प्रवर्ग चा एकूण खर्च एकूण किंमत १ लाख 3 हजार 545 यामध्ये 51 हजार 773  शासनाचे अनुदान असणाऱ आहे.

अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदान याप्रमाणे 77 हजार 659 एवढे अनुदान 

 

शेळी गट आणि व स्थानिक जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण खर्च एकूण किंमत आहे 78 हजार 231 शासनाच्या अनुदानातून सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३९ हजार  रुपये. त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गा एकूण किंमत आहे आठ हजार 231 त्याचबरोबर शासनाचे अनुदान ५८ हजार ६७३ रु.  

 

माडग्याळ जातीच्या मेंढ्या व मेंढा 

खर्च १ लाख 28 हजार 850 सर्वसाधारण प्रवर्ग अनुदान 64 हजार 425 स्वतः लाभार्थी हिस्सा 64 हजार 425 रुपये.

अनुसूचित जाती व जमाती येथील एकूण खर्च १ लाख 28 हजार 850 अनुदान शासन असणार आहे,

96 हजार रुपये 32 हजार 212 रुपय.

 

दखनी व अन्य स्थानिक जातीच्या सर्वसाधारण प्रकारच्या एकूण खर्च एकूण किंमत एक लाख तीन हजार 545 शासनाचे अनुदान असणार आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी  ५१ हजार ७७३ रुपये. तसेच अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गात त्यांच्यासाठी एकूण खर्च एक लाख तीन हजार 545 रुपये अनुदान आहे 75%,  77 हजार 659 रुपये आहे.

 

 

 

योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती

सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कोअर बँकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडणे,

अथवा लाभार्थ्यांचे कोअर बँकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते असल्यास सदर खाते या योजनेचे संलग्न करणे आवश्यक असणार आहे.

जेणेकरून खात्यामध्ये अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे वर्ग करणे शक्‍य होणार आहे. तसेच लाभार्थ्यांना त्यांच्या आधार कार्ड व पॅन कार्ड लागू तिथे बचत खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असणार आहे. 

या योजनेंतर्गत आहे तर आपण खरेदी करू शकता, संगमनेरी उस्मानाबादी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी मंडळ गोखलेनगर पुणे 16 यांच्याकडून करण्यात येईल तर मंडळाकडे शेळ्या, मेंढ्या  उपलब्ध नसल्यास अधिकृत बाजारातून खरेदी करण्यात येईल.

 

योजनेतील शेळी मेंढी विमा

शेळीच्या मेंढ्यांची खरेदी केल्यानंतर लाभार्थ्यांचा त्यांचा विमा लगेच करून घेणे बंधनकारक राहील, 50 टक्के विमा रक्कम लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक आहे.

शेळी मेंढी गटांचा विमा लाभार्थ्यांची जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पदनाम यांच्या स्विफ्ट नावे काडण्यात येणार आहे.

तसं लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात बंधपत्र करून देणे हा आवश्यक असणार आहे.

 

 


अर्ज DOWNLOAD येथे क्लिक करा

वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क असतो ?

योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !