Sheli Samhu Yojana Maharashtra | शेळी समूह योजना सुरु पहा काय आहे योजना

Sheli Samhu Yojana Maharashtra : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी तसेच शेळी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे राज्यातील महा विकास आघाडी सरकारने शेळी समूह योजना विसरून गेलेली आहे आणि या बाबतीतलं संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत शेळी समूह योजना काय आहेत शेळी समूह योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्यात दिला जाणार आहे याचा लाभ कसा घ्यायचा आहे या बाबतीत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत या साठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल

Sheli Samhu Yojana Maharashtra

शेळी समूह योजना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास. क्षेत्रांमध्ये शेळी समूह योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आणि महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र निर्माण करणे. करिता निश्चित केले असल्याने धोरणास मान्यता देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे. शेळी पालन समूह योजनेतून काय फायदा मिळणार ही योजना ज्या जिल्ह्यात लागू आहे. त्या जिल्ह्यातील 30 हजार शेतकऱ्यांचा समूह करून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणे. व्यवसाय मध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांचे कौशल्य विकास वाढविणे. ग्रामीण भागातील बाजारपेठेत शेळ्यांना कमी बाजारभाव मिळतो. शेळी पालन समूह योजनेतून जास्त भाव मिळणार आहे. शेळीच्या मांसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेळीच्या दुधाला जसा भाव पाहिजे तसा भाव मिळत नाही. तसेच शेळीच्या दुधावर काही प्रक्रिया देखील केल्या जात नाही. या योजनेमुळे शेळीच्या दुधावर प्रक्रिया केल्या जाणार आहे. यामुळे रोजगारनिर्मिती उपलब्ध होईल.

शेळी समूह योजना उद्देश

  • समूह विकासातून राज्यातील शेळीपालन व्यवसायास गती देणे
  • नवीन उद्योजक तयार करणे
  • शेळी पालन व्यावसायिकांना बाजारपेठ निर्माण करून देणे
  • व्यवसाय करणाऱ्यांनासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे
  • ग्रामीण भागात यामुळे रोजगार निर्मिती वाढते
  • शेतकऱ्यांनाचे उत्पन्न वाढावे

शेळी समूह योजना पात्र जिल्हे 

बोंद्री तालुका रामटेक जिल्हा नागपूर – नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. तीर्थ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद – औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद. रांजणी तालुका कवठेमहाकाळ जिल्हा सांगली – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.  बिलाखेड, तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव – नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर. दापचरी जिल्हा पालघर – मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग याप्रमाणे महसुली विभागात शेळी समूह योजना राबविली जाणार आहे.

शेळी समूह योजना काय आहे.

शेळी समूह योजनांसाठी सात कोटी 81 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. पोहरा या प्रमाणेच राज्यातील उर्वरित पाच महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यालाच आपण शेळी समूह योजना देखील म्हणू शकतो आणि त्यालाच शेळी समूह योजना नाव देण्यात आलेला आहे. राज्यातील शेळीपालनाचा व्यवसाय हा भूमिहीन ग्रामीण तसेच अल्पभूधारकांसाठी उपजीविकेचे महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यांनी देशाच्या एकूण संख्येत महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर असून राज्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या दुधा पैकी दोन टक्के वाटा दुधाचा आहे. तसेच राज्यात एकूण उत्पादनाच्या 12.4 टक्के एवढे उत्पादन शेळीच्या मांसाची होते. आणि यासाठीच याची उत्पादन वाढ व्हावी यासाठी शासनाने ही शेळी समूह योजना 2022 सुरू केलेली आहे.

Sheli Samhu Yojana Maharashtra

हेही पहा; 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !