Shet Jamin Vatani Kayda | Shet Jamin Vatani in Marathi | शेत जमीन वाटणी कायदा | जमीन नावावर करण्यासाठी कागदपत्रे | वडिलोपार्जित जमीन नावावर करणे

Shet Jamin Vatani Kayda :- नमस्कार सर्वांना, शेत जमीन वाटणी कशी करावी या लेखात जाणून घेणार आहोत. शेत जमीन वाटणी करण्यासाठी शेत जमीन मोजणी कशी करावी लागते.

यासाठी खर्च किती येतो, नोंदणी कशी करावी लागते याबद्दल या लेखांमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि जाणून घ्या.

जमीन शंभर रुपयात ही जमिनीची वाटणी कशी केली जाते. व त्या बद्दलची संपूर्ण माहिती व या योजनेबद्दलचा शासन निर्णय तसेच परिपत्रक या लेखात पाहायला मिळणार आहे.

Shet Jamin Vatani Kayda

Shet Jamin Vatani Kayda

शासन परिपत्रक क्रमांक: जमीन-०७/२०१४/प्र.क्र.१३०/ज-१ जागतिक व्यापार केंद्र, सेंटर वन इमारत, कफ परेड मुंबई-०५ दिनांक १६ जुलै, २०१४ शेतक-यांनी धारण केलेल्या शेत जमीन

मध्ये एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमीनीतील हिश्श्याचे विभाजनाकरिता जिल्हाधि-कारी यांच्याकडे अर्ज करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६च्या,

कलम -८५ मध्ये आहे. काही जिल्हयात जिल्हाधिकारी यांचे सदर अधिकार संबंधित तहसिलदार यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुषंगाने सहधारक असलेल्या जमीनीतील हिश्श्याचे वाटपाची/विभाजनाची कार्यवाही करण्यात येत आहे.

शेत जमीन वाटप कायदा GR

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ मधील तरतूदीच्या बाहेर जाऊन नोंदणीकृत वाटप पत्र. असल्याशिवाय काही जिल्हयात वाटणी व विभाजन करण्यात येत

नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तहसिलदार यांच्यास्तरावर. बरीच हिश्श्ये वाटणीची प्रकरणे प्रलंबित असून यामूळे शेतक-यांची कामे प्रलंबित राहिल्याने

शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झाला. असल्याबाबत शासनास निवेदन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ च्या, कलम-८५, विभाजन याबाबतची तरतूद पाहता.

शेत जमीनीव्या वाटणी पत्राच्या नोंदणीबाबत असलेला संभ्रम. करण्याच्या संबंधित जिल्ह्याच्या शासन परिपत्रक क्रमांकः जमीन- ०७/२०१४/प्र.क, १३०/ज-१

क्षेत्रीय कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने. निकाली काढण्याच्या उददेशाने स्वयंस्पष्ट सूचना क्षेत्रिय अधिका यांना देणे गरजेचे आहे.

📑 येथे क्लिक करून डाउनलोड करा वाटणी पत्र अर्ज pdf माहिती 

शेत जमीन नावावर कशी करावी 

शासन परिपत्रक उपरोक्त पार्श्वभूमी अनुषंगाने व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या, कलम-८५ मधील तरतुदी विचारात घेऊया.

या विभागातील सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या, कलम ८५ मध्ये शेतक यांनी

धारण केलेल्या शेतजमीनमध्ये एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमीनीतील हिश्श्याचे विभाजनाबाबत असलेल्या तरतूदीकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

०२. मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ याचिका क्र.२८१५/२००२ श्री.अरविंद यशवंतराव देशपांडे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे.

📢 100% अनुदानावर या शेतकऱ्यांना सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु

शेत जमीन कायदा GR

हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होवून सहधारकाला मिळकत प्राप्त होणे, ही प्रक्रिया हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाही, म्हणून वाटणीपत्राची नोंदणी करणे सक्तीचे नाही.

या आदेशानुषंगाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी संदर्भाधिन क्र.३ येथे नमुद दिनांक १०.५.२००६ रोजीचे परिपत्रक निर्गमित करुन

सर्व जिल्हाधिकारी यांना स्वयंस्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ०३. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या, कलम- ८५ मधील तरतूद

मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडे दाखल याचिका क्र. २८१५/२००२ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश पाहता.

शेत जमीन वाटणी कायदा 

शेतक-याने धारण केलेल्या शेतजमीनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असतील तर अशा, तसेच एकत्र हिंदु कुटुंबाच्या मालकीच्या धारण जमीनीतील आपल्या हिश्श्याच्या वाटणी /

विभाजनाकरीता जिल्हाधिकारी /तहसिलदार यांच्याकडे अर्ज केल्यास, त्या प्रसंगी संबंधित सहधारकाकडे नोंदणीकृत वाटप-पत्राची मागणी करण्यात येऊ नये,

विभाजन/वाटणी अनुषंगाने जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ च्या. कलम ८५ मधील तरतद व त्याखालील नियमान्वये कार्यवाही करावी.

शेत जमीन वाटणी करण्यासाठी आपल्याला वाटणीपत्र अर्ज करावा लागतो. तर वाटणी पत्र अर्ज कसा करावा व वाटप अर्ज डाउनलोड कुठून करायचा आहे.

तसेच वाटणी पत्र अर्ज यामध्ये काय काय माहिती भरायचे आहे. हे देखील माहिती जाणून घेण्यासाठी तसेच अर्ज पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner / founder of Smart Baliraja. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment


error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !