Shet Rasta Niyam | Shet Rasta Kayda | शेतीला रस्ता नाही | शेतीसाठी रस्ता कसा मिळवायचा

shetat janyasathi rasta pahije

Shet Rasta Niyam : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही किंवा रस्ता अडवला आहे. रस्ता आहे परंतु आपणास रस्त्यावरून जाऊ देत नाहीये अडथळा आणत आहे. अशा वेळेस कायद्यानुसार आपल्याला शेतरस्ता कसा मिळेल. त्याचबरोबर आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही तर कायद्यानुसार आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता कसा मिळेल. त्या साठी अर्ज कसा करायचा आहे ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. Rasta magni arj | रस्ता मागणी अर्ज pdf | shet rasta kayda 

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शेता रस्ता मिळविण्यासाठी अर्ज कुठे करावा ?

शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्त्याची मागणी ही कोणत्या कायदेशीर तरतुदी अंतर्गत आपल्याला करता येते. व अर्ज करता येतो त्या विषयी माहिती पाहूयात. महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 नुसार स्वतःच्या शेत जमिनी मध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल. तर महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 मध्ये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमावरून रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करता येते. तहसीलदारांकडे अर्ज या विषयी सादर करता येतो. अर्थातच आपल्या शेतात जाण्यासाठी दुसऱ्याच्या शेतामधून आपल्याला रस्ता घेता येतो. त्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करता येतो तर या संदर्भातील संपूर्ण माहिती काय तरी आपण पाहूयात.

शेतीला रस्ता नाही कसा मिळवायचा

 • रस्ता मागणी साठी अर्ज केल्यानंतर ची पुढील प्रक्रिया काय असेल :- 
 • मोजणी अर्ज दाखल केला जातो
 • तहसिलदाराकडून अर्जदार व ज्या शेतकऱ्यांच्या भूमापन क्रमांकाचे सिनेमावरून रस्त्याची मागणी केली आहे अर्थात ज्या ठिकाणी वरून मागणी करण्यात आली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे दाखल करण्याची संधी देखील देण्यात येते 
 • अर्जदाराने सादर केलेल्या कच्च्या नकाशावरून किमान किती फुटाचा रस्ता देणे आवश्यक आहे याची देखील खात्री केली जाते 
 • तहसिलदाराकडून स्थळ पाहणी करण्यात येते त्या स्थळ पाहणी च्या वेळेस अर्जदाराला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता गरज आहे काय याची देखील खात्री करण्यात येते
 • अर्जदाराच्या शेताचे यापूर्वी चे मालक कोणत्या मार्गाचा वापर करीत होते याची चौकशी करण्यात येते
 • नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर सर्वात जवळचा मार्ग अर्थातच अर्जदाराच्या शेतात जाण्यासाठी चा सर्वात जवळचा मार्ग कोणता आहे याची देखील चौकशी करण्यात येते
 • मागणी केलेला रस्ता बांधावरून आहे का याची खात्री करण्यात येत
 • अर्जदाराला शेतात येण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे का याची देखील चौकशी करण्यात येते
 • अर्जदाराला नवीन रस्ता दिल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याचे प्रमाण किती असेल याची देखील (Shet Rasta Niyam) पाहणी करण्यात येते
 • नवीन रस्ता देणे आवश्यक आहे का याची खात्री पटल्यानंतर तो लगतच्या शेतीच्या हद्दी बांधावरून देण्यात येतो. अर्थातच बांधा लगतच्या जमिनीवरून रस्ता देण्यात येतो
 • तसेच त्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल असे देखील पाहिल्या जाते. उपरोक्त सर्व शहानिशा करून तहसीलदार आदेश पारित करून अर्ज मान्य करतात. किंवा त्या ठिकाणी वरील अटी शर्ती या ठिकाणी पात्र होत नसेल तर अर्ज देखील हा फेटाळला जातो.
 • वाजवी रुंदी पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्याची मागणी अर्जदाराकडून असल्यास या शेतकऱ्याकडून रस्त्याचे हक्क विकत घेणे अपेक्षित आहे. सरकारी नियमानुसार ज्या लांबी-रुंदी पेक्षा जास्त रस्ता हवा असल्यास त्या शेतकऱ्याला जी रक्कम आहे हक्क आहे हा द्यावा लागतो.

शेत रस्ता मागणी अर्ज मागणी 

अर्जाबरोबर तसेच अर्ज आपल्याला कुठे उपलब्ध होईल याविषयी माहिती पाहुयात. त्याचबरोबर कोणत्या नियमांतर्गत आपल्याला रस्ता मागणीसाठी अर्ज करतांना कागदपत्रे जोडायचे पाहुयात. महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 तहसीलदाराकडे रस्ता मागणीसाठी अर्ज करावा लागतो. खालील कागदपत्रांची अर्ज बरोबर सादर करावी लागणार आहे. पुढील कागदपत्रे ही आवश्यक असणार आहे. अर्जदाराच्या शेतजमिनीला आणि त्यालगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे.

शेत रस्ता मागणी अर्ज कागदपत्रे
 • कच्चा नकाशा आपल्याला द्यावे लागणार आहे.
 • अर्जदाराचा शेतजमिनीच्या शासकीय मोजणी नकाशा उपलब्ध असल्यास तो द्यावे लागणार आहे
 • अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सातबाराचा उतारा देखील लागणार आहे.
 • शेत जमीन लगतचे शेतकऱ्यांची नावे व पत्ते अर्थातच जवळ शेतकरी चे आहेत त्यांचे नाव व पत्ता द्यावे लागणार आहे
 • अशा जमिनी बाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्याची माहिती कागदपत्र तहसीलदारांना द्यावी लागते
 • अर्ज नमुना आपल्याला पुढे दिलेल्या लिंकवर मिळेल :- येथे पहा अर्ज

अर्जाच्या प्रोसेस फी म्हणून योग्य त्या किमतीचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा व पोहोच आपल्याला घ्यायचे आहेत. जितके जाब देणार असतील तितक्या अर्जाच्या व सलंग्न कागदपत्रांच्या प्रती आपल्याला सादर कराव्या लागणार आहे.


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 1 लाख 68 हजार अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !