Sheti Tar Kumpan Yojana :– शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आणि ते म्हणजेच शेतकऱ्यांना वन्य प्राण्यां-पासून किंवा अन्य काही कारणांमुळे शेतीला तार कुंपण करावे लागते.
याचाच विचार करता सरकारने शेतीला लोखंडी तार कुंपन योजना सुरू केली आहे. नेमकी शेतीला तार कुंपन योजना ही कोणती आहे कोणत्या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करायचा आहे.
शेतीला तार कुंपन योजना ही यासाठी अर्ज सादर कसा करायचा आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती तसेच शासनाच्या शासन निर्णय अनुदान कसे दिले जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.
Sheti Tar Kumpan Yojana
आपल्याला माहीतच असेल की गावामध्ये किंवा डोंगर या कडे शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वन्यप्राणी असतील. अन्य सगळे प्राणी असतील यांच्यापासून पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत.
यासाठी सरकारने लोखंडी तार कुंपन योजना सुरू केलेले आहेत. या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र व वन्यजीव व संरक्षित क्षेत्राच्या सीमेच्या 2 किलोमीटर आतील.
गावांमधील यांनी ही योजना राबवली जाणार आहे. यांनी सदर योजनेचे नाव जर आपण पाहिलं तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजना ही सुरू करण्यात आलेले आहे.
आपल्याला माहीतच असेल की डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना हे या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना शेतीला लोखंडी तार कुंपन योजना अनुदान दिले जाते.
📑 हे पण वाचा :- शेतात पोल,डीपी आहे का ? मग मिळवा 5 हजार रु. जाणून घ्या कायदा लगेच
शेतीला तार कुंपण योजना GR
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत शेतीला लोखंडी तार कुंपन योजना ही राबवण्यात येत असते. आणि सदर योजनेअंतर्गत अर्ज सादर कुठे करायचे.
या संदर्भातील संपूर्ण माहिती तसेच या योजनेची संपूर्ण शासन निर्णय आपल्याला खाली दिलेले आहे. ते आपण नक्की पहा. आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना हा लेख शेयर करायला विसरू नका. या ठिकाणी संपर्क करा :- संबंधित व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्रपाल.
येथे पहा शासन निर्णय व संपूर्ण माहिती
शेतीला तार कुंपण अनुदान किती व कसे ?
फेन्सिंगकरता येणाऱ्या एकूण खर्चापैकी ९० टक्के रक्कम शासकीय अनुदान राहील व १० टक्के रक्कम सामूहिक लाभार्थ्यांचा हिस्सा राहील. लाभार्थ्यांनी १० टक्के हिस्सा समितीच्या खात्यात जमा
केल्यानंतरच देय रक्कम टप्प्यानुसार धनादेशाद्वारे लाभार्थ्यांना अदा करण्यात येईल. अटी व शर्ती शेतकऱ्यांना एकत्र येऊन किमान दहा लोकांचा गट स्थापन करावा लागेल.
सदर जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नसावे. जमिनीवर कमीतकमी १०० रोपे ( साग, बांबू इत्यादि) प्रतिहेक्टरी लावलेली असावीत. निवडलेले क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमणमार्गामध्ये (कॉरिडोर) नसावे.
सदर जमीन वापर प्रकार पुढील १० वर्ष बदलता येणार नाही. वन्यजीव विभागाबरोबर करावयाच्या करारनाम्यामध्ये याचा उल्लेख असेल. या क्षेत्रात वन्य प्राण्यांकडून शेत पिकाचे नुकसान होत आहे, असा समितीने ठराव द्यावा लागेल.
शेतीला तार कुंपण योजना कागदपत्रे
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे संबंधित शेतीचा अद्ययावत ७/१२ उतारा आणि नकाशा. एकापेक्षा जास्त शेतमालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकारपत्र. आधार कार्ड\निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
बॅंक पासबुकची अद्ययावत प्रत. ग्रामपंचायतीचा दाखला. समितीचा ठराव व त्याआनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र लाभार्थ्याकडून १० टक्के हिस्सा प्राप्त करण्याचे समितीचे हमीपत्र.