Shetila Tar Kumpan Yojana 2023 | शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना | जिल्हा परिषद अनुदान योजना 2023

Shetila Tar Kumpan Yojana 2023 :- आजच्या या लेखा मध्ये आपण वन्य प्राण्यापासून शेती संरक्षणासाठी तार कुंपण ९०% अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, या योजने मध्ये कोणाला अनुदान दिले जाणार व त्यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहे.

  • गावातील जन, जल, जंगल, जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे.
  • गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे. शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे.
  • पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे.
  • मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणे.
  • गावकऱ्यांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे.
  • व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे.

Shetila Tar Kumpan Yojana 2023

डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच  अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे ९०% अनुदानावर राबविण्यात येणार आहे. 

शेतीला लोखंडी तार कुंपण 

लाभार्थी पात्रता:- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच  अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर या मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल. जसे अत्यल्प भूधारक अश्या प्रकारे प्राधान्य राहणार आहे 

जिल्हा परिषद अनुदान योजना 2023

९० टक्के अनुदान या लाभार्थ्यांना अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली पाहूयात 👇 शेतीच्या कुंपणा:- करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब  पुरविणे.

उद्देश :-पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते. लाभार्थी निकष :- जिल्हयातील अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत.

लाभाचे स्वरूप :-साधारणता दोन क्विंटल काटेरी तार सोबत 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 10 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.

 शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे.

  • उद्देश :– पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75 टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते.
  • लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
  • लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
  • अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) 
  • अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !