Shetila Tar Kumpan Yojana | 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना सुरु

Shetila Tar Kumpan Yojana

Shetila Tar Kumpan Yojana | 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना सुरु

आजच्या या लेखा मध्ये आपण वन्य प्राण्यापासून शेती संरक्षणासाठी तार कुंपण ९०% अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कि या योजने मध्ये कोणाला अनुदान दिले जाणार व त्यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहे, तर सुरु करूया जाणून घेऊया संपूर्ण माहिती. 

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना 

योजनेची उद्दिष्ट:- डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच  अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे ९०% अनुदानावर राबविण्यात येणार आहे. 

शेतीला लोखंडी तार कुंपण 

लाभार्थी पात्रता:- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच  अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर या मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल. जसे अत्यल्प भूधारक अश्या प्रकारे प्राधान्य राहणार आहे.

90% अनुदान कोणाला मिळणार ? 

९०% टक्के अनुदान या लाभार्थ्यांना अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली पाहूयात 

शेतीला तार कुंपण योजना

शेतीला तार कुंपण योजना उद्देश :- शेतीच्या कुंपणा:- करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे.
पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते. 
लाभाचे स्वरूप :- साधारणता दोन क्विंटल काटेरी तार सोबत 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 10 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.

शेतीला तार कुंपण योजना अर्ज करावा 

अर्ज करण्याची पध्दत :- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.

Shetila Tar Kumpan Yojana 

शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे उद्देश :– पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75% टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते.

लाभार्थी पात्रता व अनुदान 
जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत. लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.

शेतीला तार कुंपण अर्ज 

विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)  अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ) इ.
📢 सादर योजनेचे कागदपत्रे/अर्ज कसा करवा हा व्हिडिओ पहा 
📢 सादर योजना हि फक्त चंद्रपूर जिल्ह्यात राबवण्यात येत असते ते हि ठराविक कालावधी मध्ये व त्याचबरोबर डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत राबवण्यात येणारी योजना फक्त पुढील ठिकाणी राबवली जाते याची नोंद घ्यावी.

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना सुरु :- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन योजना सुरु :- येथे पहा

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !