Shetkari Karjmafi Yadi 2021 | या कर्जदार शेतकऱ्यांना शेवटची संधी फक्त 2 दिवस

Shetkari Karjmafi Yadi 2021

Shetkari Karjmafi Yadi 2021 | या कर्जदार शेतकऱ्यांना शेवटची संधी फक्त 2 दिवस

शेतकरी कर्जमाफी योजना 2021

राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र पाच हजार ३०० शेतकऱ्यांची यादी जाहीर केली

आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या सहकार सेवा केंद्रात, जिल्हा बँकेच्या शाखेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून

घ्यावे”, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत

यापूर्वी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तथापि, काही कारणांनी ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी येत्या १५

नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रांचे प्रमाणीकरण करता येणार आहे. ही तारीख अंतिम आहे. त्यानंतर मात्र हे शेतकरी लाभापासून वंचित

राहणार आहेत.

Shetkari Karjmafi Yadi 2021

जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ८६ हजार ८६१ शेतकऱ्यांना १७४२ कोटींचा लाभ मिळाला आहे. राज्यात

कर्जमाफी मिळालेले शेतकरी आणि कर्जमाफीच्या रकमेमध्ये नगर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे. या योजनेच्या

लाभापासून काही शेतकरी वंचित होते. ते पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या प्रमाणीकरणामुळे त्यांना लाभ मिळाला नाही.

अशा शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना १५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. नवीन यादीत आलेले, तसेच

जुन्या यादीतील पात्र चार हजार ६७८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. या सर्व शेतकऱ्यांनी वेळेत आधार

प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.


📢 वडिलोपार्जित संपत्ती मुलीचा अधिकार :- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !