Shetkari Savakari Karjmafi Yojana | शेतकऱ्यांचे हे कर्ज 100% माफ होणार GR

Shetkari Savakari Karjmafi Yojana | शेतकऱ्यांचे हे कर्ज 100% माफ होणार GR 

Shetkari Karj mafi Yojana 

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा

करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन

निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात

आले होते. त्यानुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ मधील सदर अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप

केले आहे त्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाडयातील १४ जिल्हयांतील ३७४९ कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज रक्कम रु. ९.०४

कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक

वर्षासाठी रु. ५.०० कोटी इतक्या रक्कमेची तरतूद करण्यात आलेली असून वित्त विभागाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र.३

अन्वये सदर तरतूदींपैकी ५०% निधी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार रु. २.५० कोटी इतका निधी

वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शेतकऱ्यांचे सावकारी कर्जमाफी योजना 

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२

या आर्थिक वर्षातील मंजूर तरतूदीमधून रु.२.५० कोटी इतका निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात

येत आहे. सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे

अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन) सहकार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी

म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

तसेच लेखाधिकारी अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण

अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक,

सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे. तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी

सदर खर्च हा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या विभागाच्या मागणी क्र. व्ही-२, २४२५,

सहकार (००)(०१) परवानाधारक सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड (कार्यक्रम) (दत्तमत) ३३ अर्थसहाय्य

(२४२५२४४४) या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ या वर्षासाठी मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा. उक्त निधी

वितरीत करताना संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ व २ मध्ये नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करुन त्यानुसार अटी / शर्तीची तंतोतंत

पुर्तता झाल्यानंतरच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी अनुदानाचे वाटप करावे. तसेच सदर योजनेची काटेकोर

अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजनेचे संनियंत्रण करावे. सदर निधीमधून वितरीत करण्यात आलेल्या रकमेबाबतचा

जिल्हा-निहाय तपशीलवार अहवाल प्रती महा शासनास सादर करावा.

शेतकरी कर्जमाफी योजना २०२१-२२

विधीमंडळाच्या सन-२०१४ च्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत टंचाई सदृश्य परिस्थिती संदर्भात झालेल्या चर्चे वेळी विदर्भ

व मराठवाडयातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त

करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात निवेदन केले होते. तसेच मा. मंत्री (महसूल) यांनी देखील

शेतकऱ्यांनी नोंदणीकृत सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची १००% रक्कम सरकार भरेल, शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले

कर्ज शासनाकडून माफ करण्यात येणार आहे असे निवेदन विधान परिषदेच्या सभागृहात केले होते. त्या अनुषंगाने विदर्भ व

मराठवाडयातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून (Shetkari Savakari Karjmafi Yojana) घेतलेले कर्ज

माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना पात्रता 

  • कर्जदार व्यक्ती ७/१२ धारक शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास असे कर्ज या योजनेस पात्र राहिल.
  • (कुटुंब या शब्दप्रयोगाचा अर्थ पत्नी, पती, आई, वडील, मुलगा, अविवाहित मुलगी व सून असा आहे.) तथापी कुटुंबातील एकच व्यक्ती सदर योजनेस पात्र राहिल.
  • सदर व्यक्तीने ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे.
  • परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र नाही.
  • परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेली पगारदार व्यक्ती, निवृत्तीवेतन धारक व्यक्ती व मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती या योजनेला पात्र नाहीत.
  • वरीलप्रमाणे अपात्रता धारण करीत नसल्याबाबत कर्जदार व्यक्तीने उप/सहाय्यक निबंधक यांना हमीपत्र सादर करावे.
  • हमीपत्रातील माहिती चुकीची/ खोटी आढळून आल्यास कर्जदार व्यक्ती फौजदारी स्वरुपाच्या कारवाईस पात्र राहील असा हमीपत्रात स्पष्ट उल्लेख असावा.

कर्जमाफीचा क्लेम/अर्ज सादर कार्यपद्धत

  • परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या व व्याजाच्या तपशीलासह विहित नमुन्यात संबंधित तालुक्याचे उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे क्लेम / प्रस्ताव सादर करावा.
  • सावकाराकडून प्राप्त होणाऱ्या क्लेम / प्रस्तावातील कर्जदार व्यक्ती शेतकरी असल्याबाबत संबंधित उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी तलाठयाकडून प्रमाणित करुन घ्यावे.
  • उप/सहाय्यक निबंधक यांचे पत्र प्राप्त झाल्यापासून तलाठयाने सात दिवसांच्या आत दाखला द्यावा.
  • उप / सहाय्यक निबंधक / लेखापरीक्षक यांनी सावकाराच्या प्रस्तावाची तपासणी करुन व सावकाराकडून कर्ज घेतल्याबाबत १००% शेतकऱ्यांची रुजवात घेऊन त्यांच्या अभिप्रायासह प्रस्ताव तालुकास्तरीय समितीस सादर करावा.
  • ७/१२ धारक शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्याने सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास अशी कर्जदार व्यक्ती शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य असल्याबाबत शिधापत्रिकेची छायाप्रत जोडण्यात यावी.
  • सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जासंबंधी विहित अभिलेख्यांचे लेखापरिक्षण विशेष लेखापरिक्षक (वर्ग-१ किंवा वर्ग-२) / लेखापरिक्षक (श्रेणी-१ किंवा श्रेणी-२) / उपलेखापरिक्षक, सहकारी संस्था, यांनी करुन कर्जमाफीच्या रकमेची निश्चिती करावी. तसेच सावकारांनी अभिलेख नियमानुसार ठेवले आहेत याची खात्री करावी.
  • सदर प्रस्तावात सावकारांच्या बँक खात्याचा तपशिल समाविष्ट करावा. (सावकाराचे पूर्ण नाव, बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, शाखेचा IFSC कोड)

सदर योजनेचे संपूर्ण GR 

सावकारी कर्ज कसे माफ होणार 

सावकाराने तारण घेतलेल्या वस्तू / मालमत्ता संबंधीत शेतकऱ्यास परत करुन अशी तारण वस्तु | मालमत्ता परत केल्याबाबत सावकाराने उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना हमीपत्र दयावे.

या हमीपत्रातील माहिती चुकीची / खोटी आढळून आल्यास संबधित सावकार फौजदारी स्वरुपाच्या कारवाईस पात्र राहील याबाबत हमीपत्रात (Shetkari Savakari Karjmafi Yojana) स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.
वरीलप्रमाणे तारण वस्तु / मालमत्ता संबंधित शेतकऱ्यास मिळाल्याबाबत उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी शेतकऱ्याकडून हमीपत्र प्राप्त करुन घ्यावे.

क्लेमची रक्कम सावकारास वितरित करणे

१. तारणातील वस्तू / मालमत्ता शेतकऱ्यास परत मिळाल्याबाबत उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेली क्लेमची / कर्जमाफीची रक्कम जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी संबंधीत सावकाराच्या बँक खात्यात NEFT / RTGS व्दारे जमा करावी.

२. सावकाराने शेतकऱ्यास दिलेल्या कर्जाची व्याजासह शासनामार्फत सावकारास परतफेड करतेवेळी अशा शेतकऱ्याकडून कर्जाची कोणत्याही प्रकारची येणे बाकी नसल्याचे हमीपत्र संबंधित सावकाराने उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना द्यावे.
३. सदर हमीपत्र प्राप्त झाल्यानंतर संबधीत शेतकरी कर्जमुक्त झाल्याबाबत उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी संबंधित शेतकऱ्यास प्रमाणपत्र दयावे.


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती ? :- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन योजना सुरु:- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !