Shetkari Savakari karjmukati Yojana | या शेतकऱ्यांचे 100% कर्जमाफ योजना सुरु

Shetkari Savakari karjmukati Yojana | या शेतकऱ्यांचे 100% कर्जमाफ योजना सुरु

नमस्कार सर्वाना,आजच्या या लेखा मध्ये आपण शेतकरी कर्जमाफी योजना ज्या शेतकऱ्यांनी परवाना धारक सावकाराकडून कर्ज घेतले आहे अश्या सर्व शेतकऱ्यांचे पूर्ण 100% टक्के कर्जमाफी होणार आहे, तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेव कोणते जिल्हे यामध्ये पात्र आहे व या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता,कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती पहाणार आहोत त्या साठी खाली दिलेली माहिती आपण पाहूयात.

Shetkari Karj mafi Yojana 

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा

करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन

निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात

आले होते. त्यानुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ मधील सदर अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप

केले आहे त्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाडयातील १४ जिल्हयांतील ३७४९ कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज रक्कम रु. ९.०४

कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक

वर्षासाठी रु. ५.०० कोटी इतक्या रक्कमेची तरतूद करण्यात आलेली असून वित्त विभागाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र.३

अन्वये सदर तरतूदींपैकी ५०% निधी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. (Shetkari Savakari karjmukati Yojana) त्यानुसार रु. २.५० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शेतकरी कर्जमाफी योजना २०२१-२२

विधीमंडळाच्या सन-२०१४ च्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत टंचाई सदृश्य परिस्थिती संदर्भात झालेल्या चर्चे वेळी विदर्भ

व मराठवाडयातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त

करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात निवेदन केले होते. तसेच मा. मंत्री (महसूल) यांनी देखील

शेतकऱ्यांनी नोंदणीकृत सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची १००% रक्कम सरकार भरेल, शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले

कर्ज शासनाकडून माफ करण्यात येणार आहे असे निवेदन विधान परिषदेच्या सभागृहात केले होते. त्या अनुषंगाने विदर्भ व

मराठवाडयातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून (Shetkari Savakari Karjmafi Yojana) घेतलेले कर्ज

माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना पात्रता 

  • कर्जदार व्यक्ती ७/१२ धारक शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास असे कर्ज या योजनेस पात्र राहिल.
  • (कुटुंब या शब्दप्रयोगाचा अर्थ पत्नी, पती, आई, वडील, मुलगा, अविवाहित मुलगी व सून असा आहे.) तथापी कुटुंबातील एकच व्यक्ती सदर योजनेस पात्र राहिल.
  • सदर व्यक्तीने ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे.
  • परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र नाही.
  • परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेली पगारदार व्यक्ती, निवृत्तीवेतन धारक व्यक्ती व मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती या योजनेला पात्र नाहीत.
  • वरीलप्रमाणे अपात्रता धारण करीत नसल्याबाबत कर्जदार व्यक्तीने उप/सहाय्यक निबंधक यांना हमीपत्र सादर करावे.
  • हमीपत्रातील माहिती चुकीची/ खोटी आढळून आल्यास कर्जदार व्यक्ती फौजदारी स्वरुपाच्या कारवाईस पात्र राहील असा हमीपत्रात स्पष्ट उल्लेख असावा.

सदर योजनेचे संपूर्ण GR 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !