Shettale Anudan Yojana Form :- नमस्कार सर्वांना, आज लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्याना शेतीसाठी आणि खास करून उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते. त्यावेळी शेत पिकांना पाणी देण्यासाठी साधन नसते, किंवा विहिरीत पाण्याची कमतरता येते.
त्यामुळे सर्वात उत्तम पर्याय असतो तो म्हणजे शेततळे तर शेततळ्यासाठी विविध योजना आहेत. आता वैयक्तिक शेततळे देखील करू शकता, तर आता 30×30×3 साठी शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. आणि आता वैयक्तिक शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.
Shettale Anudan Yojana Form
अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने शेतकरी बांधव करू शकतात, शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?. शेततळ्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ?, कोणत्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावयाचे ? आहेत. अनुदान किती मिळणार आहे ? याबाबतची सविस्तर माहिती तुमच्यासाठी आज जाणून घेऊया.
राज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राज्यभरात राबवण्यात येत असते. आणि सोबतच या योजनेत तुम्हाला शेततळे अनुदान योजनेचा लाभ दिला जातो. सर्वप्रथम आज जाणून घेऊया की शेततळे बांधण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रता काय हवी ? शेततळे अनुदानासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी 0.40 म्हणजेच 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
शेततळे अनुदान योजना अनुदान किती मिळते ?
अर्जदार शेतकऱ्यांनी जमीन शेततळे खोदण्याच्या तांत्रिकदृष्ट्या योग्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे किंवा सामूहिक शेततळे किंवा भात खासरातील बोडी किंवा इतर कुठल्या शासकीय योजनेतून शेततळे घटकाकरिता शासनाकहे अनुदान लाभ घेतलेला नसावा हे लाभार्थी अर्ज करू शकतात.
आता 30×30 साठी म्हणजे शेततळ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज शासनाच्या पोर्टल वर ऑनलाईन सुरू झाले आहेत. राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अनुदान उपलब्ध झाले आहेत.
📑 हे पण वाचा :- अरे वा ! गोड बातमी आता चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार सुरू, कोणाकडून घ्याल जमीन ? कोण मालक ? काय एकरी मिळते चंद्रावर जमीन वाचा पटकन !
महाडीबीटी शेततळे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज
तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी लाभ घेऊ शकता. सदर शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज मोबाईल वरून किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, किंवा जवळच्या स्थिती ग्रामपंचायत कार्यालय किंवा महा ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अनुदानसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
वैयक्तिक शेततळे अनुदान हे आकारमानानुसार अनुदान देण्यात येते. 15×15×3 यामध्ये किती अनुदान मिळतं किंवा 30×30 साठी किती अनुदान मिळतं ? याचा संपूर्ण अधिक माहिती करीत खाली देण्यात आलेल्या लिंक वर म्हणजेच खाली दिलेल्या फोटो पाहायचा आहे.

Shettale Anudan Yojana Online Arj ?
शेततळ्याच्या अनुदानासाठी रक्कम आकारमानुसार शेतकऱ्यांना देय आहे. रक्कम 75,000 पेक्षा जास्त खर्च झालेल्यास अतिरिक्त खर्च संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी करावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. शेततळे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ?योजनेसंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.