Shram Vidya Shaikshanik Karj Yojana :- तुम्हाला तुमच्या मुला-मुलींसाठी कर्ज घ्यायचा असेल, किंवा विद्यार्थ्यांना स्वतः कर्ज घ्यायचं असेल, तर तुम्हाला तब्बल 5 लाख रुपये पर्यंत कर्ज हे बिनव्याजी मिळणार आहे.
ही योजना कोणती आहे ? कोणत्या विद्यार्थ्यांना लागू होते ?, याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आपण पाहूयात. देशातील सर्व सामान्य जनतेसाठी केंद्र सरकार राज्य सरकार देशभरात राज्यात विविध योजना राबवते.
Shram Vidya Shaikshanik Karj Yojana
आता मुला मुलींसाठी कोणती योजना शासनाकडून राबवली जात आहे ?. कशाप्रकारे बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळणार आहे, याबाबत माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी शासनाने आता राज्यातील काही पात्र शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी खास योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळवता येते,
शासनाची कोणती योजना आहे यासंबंधीतील अधिक माहिती पाहूया. कशाप्रकारे नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना हे लोन मिळणार आहे ? याबाबत माहिती पाहूयात.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी त्यांचं शिक्षण पूर्णव्हावं याकरिता “श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना” राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र मुला-मुलींना पदवीपर्यंत शैक्षणिक अगदी सहजपणे घेता येणार आहे. पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आणि आता या श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे ? पाहूयात.
- 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज
- 10 लाख रुपयांचे 2% व्याजदराने कर्ज
- 10 ते 15 लाख पर्यंत शेतकऱ्यांना 4% टक्के व्याजदराने कर्ज
मुला-मुलींसाठी बिनव्याजी कर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा घोषणा करण्यात आलेल्या आहे. ‘Shram Vidya Shaikshanik Karj Yojana’ या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजनाची माहिती दिलेली आहे.
बँकेच्या मुख्यालयामध्ये या कर्ज योजनेचे पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आलेले आहेत. आता श्रमविद्या कर्ज योजना ही योजना कर्ज उपलब्ध करून देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तयार केलेल्या ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज’ योजनेचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
या योजनेंतर्गत आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता… pic.twitter.com/9mdjpjAZvn— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 17, 2023
Education Loan
कोणतेही तारण किंवा शुल्क लागणार नाही, 5 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळवायचे असेल तर तुम्हाला जमीनदाराची देखील आवश्यकता नाही. फक्त काही अटी आणि नियम त्यात निश्चित केली गेली आहे.
- विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेमध्ये 75% टक्के गुण, 50 हजार रुपये कर्ज
- 90% गुण असेल तर त्यांना 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज
आता या योजनेत लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला जवळील बँकेमध्ये याची चौकशी करायची आहे. ही बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ ही राबवली जात आहे.
📢 सरकारची घोषणा, आता या शेतकऱ्यांना फक्त 18 हजार रुपयांत 7.5Hp सोलर पंप, नवीन कोटा उपलब्ध भरा ऑनलाइन फॉर्म ! :- येथे पहा
📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा