Sinchan Vihir Anudan Yojana | 100% अनुदानावर सिंचन विहीर योजना ऑनलाईन सुरु

Sinchan Vihir Anudan Yojana | 100% अनुदानावर सिंचन विहीर योजना ऑनलाईन सुरु

नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना स्वतःची विहीर व्हावी यासाठी राज्य शासनाने विविध योजना राबवत आहे यामध्ये शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदान वरती देण्यात येणार्‍या योजनेबद्दल आजच्या या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये कोणते शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

नवीन सिंचन विहीर योजना 2021

त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे, (Sinchan Vihir Anudan Yojana) कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, अनुदान कसे दिले जाणार आहे, त्याचबरोबर योजनेसाठी ची कागदपत्रे आपल्याला कसे अपलोड करायचे आहेत सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत यामध्ये ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नवीन विहिरी साठी आपली निवड झाली आहे का ही कशी पाहता येईल हे देखील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या मध्ये अनुदान देय (Vihir Anudan Yojana 2021) असलेले घटक पुढीलप्रमाणे:- या योजनेंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण व सुक्ष्म सिंचन संच, तुषार सिंचन संच, पीव्हीसी पाईप, परसबाग, या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविणे सुरु आहे.

नवीन सिंचन विहीर अनुदान किती ?

 • नवीन विहीर (रु.2.50 लाख)
 • जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार)
 • इनवेल बोअरींग (रु.20 हजार)
 • पंप संच (रु.20 हजार)
 • वीज जोडणी आकार (रु.10 हजार)
 • शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख)
 • सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजाररु.)
 • तुषार सिंचन संच-रु.25 हजार)
 • पीव्हीसी पाईप (रु.30 हजार)

या वरील बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.

Navin Vihir Yojana Online Application

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना यासाठी online अर्ज करू शकतो त्यासाठीचा संपूर्ण माहितीचा video पाहून घ्या नवीन विहीर साठी online अर्ज करू शकता त्यासाठीचा video:- येथे पहा   

नवीन सिंचन विहीर योजना पात्रता 

 • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
 • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.

विहीर अनुदान योजना कागदपत्रे

 • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
 • 7/12 व 8-अ चा उतारा
 • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
 • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
 • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र  
 • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
 • ग्रामसभेचा ठराव.

📢 80% ठिबक,तुषार, योजना सुरु:- येथे पहा 

📢 20+2 शेळी पालन योजना सुरु:- येथे पहा 

 

1 thought on “Sinchan Vihir Anudan Yojana | 100% अनुदानावर सिंचन विहीर योजना ऑनलाईन सुरु”

Leave a Comment