Snails On Soybeans | सोयाबीन पिकाचे गोगलगाई पासून रक्षण करण्यासठी हे काम नक्की करा

Snails On Soybeans: नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना महत्वाची माहिती. या लेखात सोयाबीन लागवड केलेल्या पण गोगलगाय ने नुकसान झाले असेल अश्या शेतकऱ्यांना शासन अनुदान देणार आहेत. तर हे कोणत्या शेतकऱ्यांना व कसे दिले जाणार आहेत, हे जाणून घेऊया. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, इतरांना नक्की शेअर करा.

Snails On Soybeans

सध्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र पसरलेली आहे. तर दुसरीकडे पहिल्यांदाच गोगलगायीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे.

सोयाबीनच्या पिकावर गोगलगायींनी केलेल्या हल्ल्यामुळे शेतातील संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेक जिल्ह्यात फक्त सोयाबीन वर नही तर भाजीपाला पिकांवर देखील गोगलगायींनी हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : PVC पाईप लाईन योजनेसाठी शासन देत आहे अनुदान येथे करा अर्ज 

दुबार पेरणी चे संकट 

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांवर गोगलगायीने हल्ला केला आहे, त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागली आहे. दुबार पेरणी करून देखील काहीच फायदा नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. भाजीपाला पिकांवर देखील गोगलगायींचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.

गोगलगायीने मिरचीचे शेंडे खाऊन संपूर्ण पिकाची नासाडी केल्याचे समोर आले आहे. यावर उपाययोजना म्हणून महागड्या औषधांची फवारणी करून देखील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या तरी शेतकऱ्यांकडे काहीच उपायोजना नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते  50 लाख रु अनुदान येथे करा अर्ज 

750 रुपये देणार अनुदान 

गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांचा वापर करावा आणि याची माहिती कृषी विभागाला द्यावी. त्यासाठी हेक्टरी 750 रुपयांचे अनुदान या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. या गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नावर जास्त परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.


📢 आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबिल वर कशी करावी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *