Solar Fencing Subsidy Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सौर ऊर्जा कुंपण योजना ही राज्य सरकारने सुरू केलेल्या आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपण योजना सुरू करण्यात आलेली आहे. तरी याच विषयी सविस्तर माहिती लेखात जाणून घेणार लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Solar Fencing Subsidy Maharashtra
शेतकरी बांधवांनो डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना ची व्याप्ती वाढवून. आता त्यामध्ये सौर ऊर्जा कुंपण उभरण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.
अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेला आहे. याचा नेमका लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी अनुदान कसे दिले जाणार आहे. सविस्तर माहिती या लेखात पहाणार आहोत.
सौर कुंपण म्हणजे काय?
सौर कुंपण हे काही वेगळे कुंपण नूसन विद्युत प्रवाहीत तारेचे कुंपण आहे. त्यात फरक फक्त एवढाच की, या कुंपणात सौर ऊर्जेपासून तयार विद्युत, प्रवाह सोडण्यात येतो.
परंतु अशा प्रकारच्या कुंपणाने (विद्युत प्रवाह असलेल्या कुंपणाने) जिवीतहानी होत नाही. या कुंपणाच्या सान्निध्यात गुरे, ढोरे, चोर. किंवा इतर कोणतेही प्राणी आल्यास त्यांना जोराचा विजेचा झटका बसून ते कुंपणापासून दूर फेकले जातात.
या कुंपणाचा विद्युत आघात असा असतो की एकदा, अनुभवल्यास कुणीही पुन्हा त्या कुंपणाजवळ जाण्याचे धाडस करत नाही. हे कुंपण 24 तास बॅटरीच्या सहाय्याने कार्य करत असते.
Jan Van Vikas Yojana
ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर. लाभार्थी उर्वरीत २५ टक्क्यांचा वाटा समितीकडे जमा करेल.
अशा संवेदनशील गावांची निवड तसेच सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे मापदंड निर्धारीत करणे. व गुणवत्ता नियंत्रण हे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील समित्या करतील.
२०२२-२३ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतील शंभर कोटींपैकी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सौर ऊर्जा कुंपणाकरिता करण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), नागपूर हे जाहीर करतील. तसेच लाभार्थ्यांना या योजनेची माहिती उपलब्ध करून देण्याकरिता माहिती व्यवस्थापन प्रणालीचा वापरण्यात येईल.
हेही वाचा:- कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु
सौर उर्जा कुंपण अनुदान योजना
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढवून त्याअंतर्गत अशा संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्याकरिता अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.
या योजनेत प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या 75% किंवा पंधरा हजार रुपये या पैकी जी कमी असेल. त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. सौर ऊर्जा साहित्याच्या किंमतीच्या अनुषंगाने उर्वरीत २५ टक्के किंवा रक्कमेचा वाटा लाभार्थ्याचा राहील.