Solar Fencing Yojana Maharashtra | शेतीला सौर ऊर्जा कुंपण योजना 75% अनुदान नवीन निर्णय आला

Solar Fencing Yojana Maharashtra : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना 75% टक्के अनुदानावर सौर ऊर्जा कुंपण दिले जाणार आहे. तर यासाठी अनुदान, कागदपत्रे, पात्रता, कोणती योजना आहे. कसा लाभ घ्यायचाआहे. अर्ज कसा करायचा, ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला समजेल.

Solar Fencing Yojana Maharashtra

शेतकरी बांधवांनो डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना ची व्याप्ती वाढवून. आता त्यामध्ये सौर ऊर्जा कुंपण उभरण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. आणि अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेला आहे. याचा नेमका लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. (solar fencing subsidy in maharashtra) यासाठी अनुदान कसे दिले जाणार आहे. सविस्तर माहिती या लेखात पहाणार आहोत.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Jan Van Vikas Yojana 2022

ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर. लाभार्थी उर्वरीत २५ टक्क्यांचा वाटा समितीकडे जमा करेल. अशा संवेदनशील गावांची निवड तसेच सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे मापदंड निर्धारीत करणे. व गुणवत्ता नियंत्रण हे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील समित्या करतील. २०२२-२३ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतील शंभर कोटींपैकी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सौर ऊर्जा कुंपणाकरिता करण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), नागपूर हे जाहीर करतील. तसेच लाभार्थ्यांना या योजनेची माहिती उपलब्ध करून देण्याकरिता माहिती व्यवस्थापन प्रणालीचा वापरण्यात येईल.

हेही वाचा; शेतीला तार कुंपण ९०% अनुदान योजना 2022 येथे पहा माहिती 

सौर उर्जा कुंपण अनुदान योजना 2022 

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढवून त्याअंतर्गत अशा संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्याकरिता अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.  या योजनेत प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या ७५ टक्के किंवा पंधरा हजार रुपये या पैकी जी कमी असेल. त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. (farm fencing subsidy) सौर ऊर्जा साहित्याच्या किंमतीच्या अनुषंगाने उर्वरीत २५ टक्के किंवा रक्कमेचा वाटा लाभार्थ्याचा राहील.

Solar Fencing Yojana Maharashtra

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Source: महासंवाद 


Solar Fencing Yojana Maharashtra | सौर उर्जा कुंपण योजना | वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण योजना | सौर ऊर्जा कुंपण अनुदान योजना | सोलर उर्जा कुंपण

📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !