Solar Pump Anudan Yojana | विहीर अनुदान योजना | सोलर पंप 100% अनुदान सुरु

Solar Pump Anudan Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नवीन सोलर पंप अनुदान योजना तसेच नवीन विहीर अनुदान योजना व इनवेल बोरवेल यासाठी 100% टक्के अनुदानावर योजना 2022 करिता सुरू झाली आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महाडीबीटी सोलर पंप अनुदान किती मिळते 

एकुण रक्कम बोरवेल/डगवेल २.५०,000/- सोलार पंप, पॅनल (4HP) २.३३.५९०/- एकूण ४,८३,५९०/- उपरोक्त नमुद बाबींकरीता ठरविण्यात आलेली. अनुदानाची मर्यादा ही शासनाच्या धोरणाप्रमाणे ठरविण्यात आलेले महत्तम मर्यादा आहे. योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रती लाभार्थी कमी खर्च येत
असेल तर त्याप्रमाणे अनुदान अदा करणेत येईल. (Solar Pump Anudan Yojana) शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांकात वाढ करण्याचे अधिकार मुल्यमापन व संनियंत्रण समिती असतील.

👉👉सोलर पंप शासन निर्णय व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

Vihir Anudan Yojana 2022 

या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

विहीर अनुदान योजना पात्रता 

  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  •  उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
नवीन विहीर योजना कागदपत्रे 2022
  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
  • 7/12 व 8-अ चा उतारा
  • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
  • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
  • ग्रामसभेचा ठराव.

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा  

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता या दिवशी जमा होणार :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !