नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या लेखात तुम्ही स्वतः घरी बसून Solar Pump Online Form Kasa Bharava ? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सध्याचा काळात सोलर पंप हा महत्वपूर्ण घटक झाला आहेत, कारण दिवसेंदिवस लाईट ही टिकत (राहत) नसल्यामुळे
शेतकऱ्यांना शेत पिकांना पाणी देणे होत नाही. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी ही कुसुम सोलर पंप योजना सुरु केली आहेत. आज या लेखात आणखी एक महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत कि कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळेल ? व किती रुपये स्वता लाभार्थी हिसा म्हणून किती रु. भरावे लागेल ?.
यांची माहिती सुद्धा आणि कुसुम सोलर पंप योजनेचा मोबाईल मधून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? आणि तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या प्रवर्गाला किती सोलर पंपाचा कोटा उपलब्ध आहेत हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन चरक करू शकता. ही सविस्तर माहिती जाणून घेऊया, सविस्तर डिटेल्स माहिती खालीलप्रमाणे आहेत संपूर्ण वाचावी.
कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र भरण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने महाउर्जा ही अधिकृत संकेतस्थळ तयार करून दिले आहेत. आणि या माध्यमातून राज्यातील शेतकरी क्सुस्म सोलर पंप योजनेचा लाभ घेता आहेत. आता कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप नुसार ऑनलाईन फॉर्म मोबाईल मधून भरयाचा आहेत.
- सर्वप्रथम तुम्हाला महाउर्जा या संकेतस्थळवर यायचे, तुम्हाला महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी या पर्याय वर क्लिक करून सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता (ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन Maharashtra)
- कुसुम सोलर पंप या संकेतस्थळ वर आल्यावर तुम्हाला वरच्या उजव्या साईडला Safe Village List दिलेस त्यावर क्लिक करा व त्या यादीत तुमच्या गावाचे नाव शोधा त्यात नाव असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येतो. किंवा नाव नसेल तर डीझेल पंप आहेत म्हणून ऑनलाईन नोंदणी करता येते.
- त्यानंतर तुम्हाला तुमची व्यक्तिगत संपूर्ण माहिती जसे आधार नंबर, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, प्रवर्ग आणि इमेल आयडी ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्हा, किंवा प्रवर्गाकरिता किती कोटा उपलब्ध आहेत दाखवेल, कोटा असेल तर तुम्ही 100 रुपये पेमेंट भरणा करून नोंदणी करून घ्यावी.
कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ?
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत तुमची नोंदणी झाली असेल, तर आता कागदपत्रे अपलोड करावी लागतात, किंवा कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
सातबारा उतारा (विहीर/कुपनलिका शेतात असल्यास सातबारा उतारा वर त्याचे नोंद असणे आवश्यक) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदारांचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या मुद्रांक कागदावर सादर करावेत. हे दोन स्टॅम्प तुम्हाला लागणार आहे, एनओसी तुम्हाला खाली दिलेले आहे.
तिथे डाउनलोड करून त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आधार कार्डचे झेरॉक्स, रद्द केलेले धनादेश किंवा बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो शेत जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही लागणार आहेत. अधिक माहिती करिता तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन जाणून घेऊ शकता.
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा