Solar Pump Quota Kasa Check Karava :- सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना अर्थातच प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना आहेत. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून राबविले जाते.
ही योजना राज्यातील किंवा देशातील शेतकऱ्यांना 3hp, 5hp, आणि 7.5hp चे पंपांसाठी हे अनुदान देण्यात येते. हे अनुदान कसे आणि कुणाला मिळते याची माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला माहीतच आहे की 90% आणि 95% टक्के हे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. यामध्ये अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गांना 95% टक्के आणि उर्वरित 05% हिस्सा हा स्वतः भरावा लागतो.
Solar Pump Quota Kasa Check Karava
आता सर्वसाधारण प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गांना 90% अनुदान आणि 10% हिस्सा स्वतः भरावा लागतो. अशा प्रकारची ही योजना आहे, राज्यातील जमीन क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना तीन एचपी ते साडेसात एचपी पंप पुरवल्या जातात.
शासनाकडून यासाठी योजना देखील आहे, जसे राज्य शासनाची मुख्यमंत्री सोलर पंप योजना आहे. आणि केंद्र सरकारची प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ही सर्वाधिक लोकप्रिय
अशी योजना आहे. त्यामुळे या योजनांचा जो काही पंपाचा कोटा आहे, हा उपलब्ध राहत नाही. आणि तुम्ही ऑनलाईन सेंटर वर जाऊन चेक करत असाल.
कुसुम सोलर पंप वैशिष्ट्य | कुसुम सोलर पंप तपशील |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा ईवम उत्थान महाभियान (पीएम-कुसुम) |
घटक | घटक-B |
राज्य | Maharashtra |
अनुदान | खुल्या वर्गातील शेतकऱ्यांसाठी 90%, SC/ST शेतकऱ्यांसाठी 95% |
पंप क्षमता | 3 HP, 5 HP, 7.5 HP |
पंपाची किंमत | Rs.1.56 lakh (3 HP), Rs.2.35 lakh (5 HP), Rs.3.21 lakh (7.5 HP) |
अनुदानाची रक्कम | Rs.1.39 lakh (3 HP), Rs.2.11 lakh (5 HP), Rs.2.89 lakh (7.5 HP) |
शेतकऱ्याने भरावी लागणारी रक्कम | Rs.17,000 (3 HP), Rs.24,000 (5 HP), Rs.32,000 (7.5 HP) |
कुसुम सोलर पंप अर्ज कसा करायचा ? | महाउर्जा वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज |
Website | https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B |
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना
त्या ठिकाणी कोठा उपलब्ध नसेल कारण जेव्हा कोठे उपलब्ध होतो थोड्याच वेळात लगेचच अर्ज हे केले जातात. त्यामुळे आता तुम्हालाही घरबसल्या जेव्हा सोलर पंप कोटा
उपलब्ध होतो, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करून त्वरितच ऑनलाइन फॉर्म भरू शकता. त्यामुळे तुम्हाला सोलर पंप मिळविण्यासाठी जो काही चान्स आहे हा लवकर मिळतो.
जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन सेंटर वगैरे ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही. आणि जो काही तुमचा वेळ आहे हा त्या ठिकाणी वाचतो.
✅ हेही वाचा :- किसान विकास पत्र मराठी माहिती, पैसे दुप्पट करून देणारी सरकारी योजना जाणून घ्या पटापट व लाभ घ्या !
Kusum Solar Pump Yojana
आता तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार, गावानुसार, तुमच्या प्रवर्गानुसार हा सोलर पंप कसा चेक करायचा आहे हे आज थोडक्यात जाणून घेऊया. हे सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्हाला कुसुम सोलर अर्थातच
शासनाच्या म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या महाऊर्जा या अधिकृत वेबसाईटवर यावे लागेल. याचा अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे महाऊर्जा या संकेतस्थळावर आल्यानंतर
तुम्हाला उजव्या बाजूला महा ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी यावरती क्लिक करायचा आहे. हे साईट ओपन होईल, आणि त्यानंतर तुमच्यासमोर कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज करण्याचा डॅशबोर्ड ओपन होईल.

सोलर पंप अनुदान योजना
आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सेफ व्हिलेज लिस्ट देण्यात आलेली आहे. म्हणजे या लिस्टमध्ये जर तुमच्या गावांचे नाव असेल तर तुम्हाला पंप हा मिळतो. जर या लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव नसेल तर तुम्हाला डिझेल पंप आहे
म्हणून नोंदणी करावी लागते. तर ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला सेफ व्हिलेज लिस्ट डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर तुमचं नाव असेल तर डायरेक्टली डिझेल पंप नाही म्हणून नोंदणी करा.

✅ हेही वाचा :- केंद्र सरकारचे नवीन App आता नागरिक व शेतकऱ्यांना वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अगोदर सूचना देईल हे App लगेच येथून Install करा !
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना
जर यादीत नाव नसेल तर डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करा. त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी आधार नंबर, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, आणि प्रवर्ग, आणि त्यानंतर ई-मेल आयडी ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट किंवा
प्रोसेस या पर्याय वर क्लिक करायचा आहे. या पर्यावर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल की तुमच्या प्रवर्गासाठी किंवा तुमच्या तालुक्यासाठी किती सोलर पंप कोटा उपलब्ध आहे ? 3hp, 5hp, 7.5hp पंप किती आहे ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल.
✅ हेही वाचा :- पोस्ट ऑफिसची नवीन योजना, योजनेत गुंतवणूक करून लाखों रु. कमवायचे का ? मग त्वरित हे खाते उघडा, योजनेचा लाभ घ्या !
पीएम कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?
जर तुम्ही त्यात पात्र असेल तर तुम्हाला आता दहा रुपये पेमेंट करून हे अर्ज तुम्हाला करता येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही नोंदणी करून घ्या. आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.
ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे ? कोण कोणती कागदपत्रे लागतात ?, याचा सविस्तर डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला शेवटी खाली देण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता, आणि ऑनलाईन फॉर्म स्वतः भरू शकता.
कुसुम सोलर पंप अनुदान किती मिळते ?
खुल्या वर्गातील शेतकऱ्यांसाठी 90%, SC/ST शेतकऱ्यांसाठी 95%
पीएम कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?
महाउर्जा वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज :- येथे अधिकृत वेबसाईट
कुसुम सोलर पंपाचे शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात ?
Rs.17,000 (3 HP), Rs.24,000 (5 HP), Rs.32,000 (7.5 HP)
कुसुम सोलर पंप किंमती कशा पहायच्या ?
पंपाची किंमत Rs.1.56 lakh (3 HP), Rs.2.35 lakh (5 HP), Rs.3.21 lakh (7.5 HP)