Solar Pump Scheme | kusum solar pump yojana 95% अनुदान फॉर्म सुरु 2022

Solar Pump Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2022 या अंतर्गत शेतकऱ्यांनी या आधी फॉर्म भरले होते. त्या सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करण्याचे पर्याय आलेले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकर पेमेंट करून घ्या. जेणेकरून आपल्याला सोलार पंप मिळण्यास कोणतीही पुढे अडचण येणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यानं यादीही कुसुम सोलर पंप 2022 महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज केलेले नाही. आशा शेतकर्‍यांना कुसुम सोलर पंप योजना अर्ज सादर करू शकता. त्यासाठी अर्ज कसा करायचं कोणती शेतकरी पात्र आहेत. कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत. अनुदान कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती दिला जाईल. या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Solar Pump Scheme.

 • सर्वात आधी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
 • वेबसाईटवर गेल्यानंतर पेज ओपन होईल.
 • होम पेजवर आपली नोंदणीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन आपला अर्ज करा.
 • आपले नाव, पत्ता. आधार नंबर, मोबाईल नंबर आदींची माहिती भरावी.
 • सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट या बटणांवर क्लिक करा.
 • नोंदणी झाल्यानंतर आपल्याला सौर पंप सेटसाठी १० टक्के लागणारा खर्च जमा करण्याची सुचना मिळते.

कुसूम सोलर पंप योजनेची पात्रता

 • अर्ज करणारा हा शेतकरी असावा.
 • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक.
 • अर्ज करण्यासाठी बँक खाते नंबर असणे आवश्यक.

👉👉कुसुम सोलर पंप योजना कागदपत्रे येथे क्लिक करून पहा👈👈 

कुसुम सोलर पंप लाभार्थी निवड

 • शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
 • अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
 • 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DO वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय राहील.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे पहा 

कुसुम सोलर पंपाची किंमत 2022 

3 एचपी च्या पंपासाठी GST सह 178097 रु., 5Hp पंपसाठी 253205 रु., 7.5 Hp पंपसाठी 390903 रु. एवढा प्रति पंप असणार आहे. आणि आता पाहुयात लाभार्थ्यांना अनुदान किती दिले जाणार किती hp च्या पंपासाठी. यामध्ये लाभार्थी हिस्सा खुला प्रवर्गासाठी 3Hp Pump मूळ किंमत 15650 रु. GST 13.8% एकूण 17810 रु. 5Hp मूळ किंमत 22 हजार 250 रुपये जीएसटी 3 हजार 71 रुपये. एकूण 25321 रु.  7.5 Hp पंप 34 हजार 350 रुपये जीएसटी 4 हजार 740 रुपये एकूण 39 हजार 990 रुपये. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3 एचपी पंपासाठी 7 हजार 825 रुपये. जीएसटी 1080 रुपये एकूण 8 हजार 905 रुपये 5 एचपी पंपासाठी 11 हजार 125 रुपये जीएसटी 1535 रुपये एकूण 12 हजार 660 रुपये. 7.5 एचपी पंपासाठी मूळ किंमत 17 हजार 175 रुपये जीएसटी 2 हजार 370 रुपये आणि एकूण 19 हजार 545 रुपये असे लाभार्थी स्वतः हिस्सा भरणे आहे.

Solar Pump Scheme

कुसुम सोलर पंप योजना संपूर्ण माहिती व GR येथे क्लिक करून पहा 


📢 कांदा चाळ योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment