Solar Subsidy Scheme | लाईट बिलाची चिंताच नाही ! घरीच वीज तयार करा; शासन देणार 40 टक्के अनुदान

Solar Subsidy Scheme :- शासनामार्फत सोलर पॅनल संदर्भातील विविध अशा योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, सोलर कृषी पंप अनुदान योजना इत्यादी कृषी विभागांच्या योजनांचा समावेश आहे.

आज आपण सोलर पॅनलच्या घरगुती योजनेसंदर्भातील माहिती पाहणार आहोत. म्हणजेच सोलार रूपटॉप योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये अर्ज कसा करावा ? अर्ज करताना कोणकोणती कागदपत्र लागतील ? यासाठी पात्रता व निकष काय असेल ? इत्यादी माहिती.

Solar Subsidy Scheme

विजेच्या मागणीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध इंधन जसे कोळसा, पाणी, अणुऊर्जा इत्यादींचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध नसल्यामुळे भविष्यकाळात ऊर्जेची (energy) अडचण निर्माण होऊ शकते.

ही बाब लक्षात घेता शासनामार्फत पारंपारिक वीज निर्मिती (electricity Generation) करता यावी. यासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयामार्फत रुफटॉप सोलर योजना (rooftop Solar Scheme) सुरू करण्यात आली.

रुफटॉप सोलर योजना

या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थी, गृहनिर्माण संस्था अथवा संघटना यांच्या निवासस्थानी स्वतःच्या छतावर रुफटॉप सोलर पॅनल बसवून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी शासनाकडून 40% पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.

सोबतच ग्राहकांकडे जर वीज मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असेल, तर अशा ग्राहकांना ऊर्जा नीट मीटरिंगद्वारे महावितरणला काही प्रमाणात वीज विकून अतिरिक्त नफासूद्धा मिळवता येणार आहे.

रुफटॉप सोलर योजनेचा मुख्य उद्देश

  • पारंपारिक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर करून इतर ऊर्जा भविष्यकाळासाठी जतन करणे.
  • मासिक घरगुती बिलात मोठ्या प्रमाणावर कपात करणे.
  • महावितरणला नेट मीटरिंगद्वारे अतिरिक्त वीज विक्री करून ग्राहकांना नफा मिळवून देणे.
  • पारंपारिक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर करून सौर ऊर्जा वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.

Solar Subsidy Scheme

येथे टच करून ऑनलाईन अर्ज करा व जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडीओ मधून लाईव्ह 

रुफटॉप सोलर पॅनलसाठी लागणारी कागदपत्रे
  • अर्जदाराचा आधारकार्ड
  • बँकेचा पासबुक झेरॉक्स (Bank Account)
  • राहत्या घराची कागदपत्र
  • चालू लाईटबिल
  • कुटुंबाचा उत्पन्न दाखला
  • रेशन कार्ड व पासपोर्ट आकाराचा फोटो
  • घरातील सहहिस्सेदारांचा संमतीपत्र (सामायिक असल्यास)
  • मोबाईल क्रमांक
विविध किलोवॅटसाठी अंदाजित खर्च खालीलप्रमाणे

मित्रांनो, खाली देण्यात आलेल्या रकान्यामध्ये 01 किलोवॅट पासून 10 ते 100 किलोवॅट सोलर अर्ज निर्मितीसाठीचा अंदाजित खर्चाचा मायना देण्यात आलेला आहे. यामध्ये जागेनुसार व विविध लागणाऱ्या उपकरणाच्या कंपनीनुसार थोडीफार रक्कम कमी जास्त होऊ शकते.

  • 1 किलोवॅट : 46,820 रु.
  • 1 ते 2 किलोवॅट : 42,470 रु.
  • 2 ते 3 किलोवॅट : 41,380 रु.
  • 3 ते 10 किलोवॅट : 40,290 रु.
  • 10 ते 100 किलोवॅट : 37,020 रु.

मित्रांनो वरीलप्रमाणे किमती बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, किलोवॅट वाढल्यानंतर किंमत कमी कशी काय होणार ? समजा वरीलप्रमाणे जर एखाद्याला 2 किलोवॅटचा रुफटॉप सौर उपकरण बसवायचा असल्यास त्याला खालीलप्रमाणे खर्च व अनुदान मिळेल.

  • 42470×2 = 84,940 रु.
  • 40 टक्के अनुदान म्हणजेच 84,940×40÷100 = 33,976 रु.
Roof Top Solar योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://solarrooftop.gov.in/ जावे लागेल. त्यानंतर वेबसाईटवरील Apply For Rooftop या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचं राज्य, वीज वितरण कंपनी इत्यादीची निवड करावी लागेल.

त्यानंतर अर्जदारांची मूलभूत अशी माहिती जशाप्रकारे वीज वितरण कंपनीचा ग्राहक क्रमांक, वीज दाब प्रकार, बिलिंग युनिट इत्यादी संपूर्ण माहिती अर्जामध्ये भरून i agree या पर्यायावर क्लिक करून अर्ज दाखल करावा

लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया तुमच्या संबंधित महावितरण विभागाच्या कार्यालयामार्फत केली जाईल. अधिक माहितीसाठी वरील देण्यात आलेल्या rooftop solar yojana च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 2022 सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !