Soybean Pivli Padne Upay | सोयाबीन पिवळी पडणे उपाय | तुमची पण सोयाबीन पिवळी पडतंय का ? त्वरित हे उपाय करून ही फवारणी तात्काळ करा वाचा सविस्तर डिटेल्स !

Soybean Pivli Padne Upay :- नमस्कार शेतकऱ्यांनो, भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतकरी बांधव घेत असतात. आणि हे पीक घेत असताना विविध रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकांवर पाहायला मिळत असतो. आणि सध्या पाऊस रिमझिम पाऊस सुरू आहे.

या रिमझिम पावसामुळे सोयाबीन पीक हे पिवळे पडत आहे. किंवा किडीचा प्रादुर्भाव त्यावर होत आहेत. तर अशा वेळी काय करावं ? हे आज या लेखाच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात. सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर कोणते उपाय करावे लागते ?.

किंवा सोयाबीन पिवळी पडली असेल तर काय करायचे आहेत ?. सोयाबीन पिवळे पडले त्यावरील उपाय किंवा औषध याची माहिती आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचा इतरांना लेख शेअर नक्की करा.

Soybean Pivli Padne Upay

सोयाबीनला गेल्या वर्षी चांगल्या प्रमाणात भाव मिळाला असून सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तरी शेतकरी सोयाबीनची लागवड करतात, तर सोयाबीन मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून सोयाबीन उगवून देखील शेतकऱ्यांची आलेली आहे.

आणि सध्या रोप अवस्थेत सोयाबीन असून ते पिवळे पडण्याचे प्रमाणात वाढ दिसून येत आहे. मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, आता एकीकडे भाव मिळत नाही तर दुसरीकडे जर सोयाबीन पिवळ पडले, तर उत्पन्न जास्त निघणार नाही.

सोयाबीन पिवळी पडणे उपाय

याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. या सर्वांचा विचार करता, सोयाबीन जर पिवळे पडले तर अशावेळी तुम्ही शेतामध्ये वाफासा स्थिती निर्माण करा. त्याचबरोबर अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याच्या सोय करावी. जेणेकरून सोयाबीन पिवळी पडणार नाही,

अर्थातच जे काही तुमच्या शेतात पाणी तुंबले असेल ते काढण्यासाठी सोय करायची आहे. आणि शेतामध्ये वाफसा स्थिती निर्माण करण्यासाठी उपाय तुम्हाला करायचे आहेत. आणि त्याचबरोबर 0.5% (50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फेरस सल्फेटचे सोयाबीनच्या पानावर फवारणी करावी.

📒 हेही वाचा :- शेतकऱ्यांनो टेन्शन सोडा ! आता शेतात खत टाकण्यासाठी हे जुगाड पहा ! 1 दिवसाचं काम 1 तासात करेल हे यंत्र पहा हा व्हिडीओ पटापट !

सोयाबीन पिकांवर फवारणी औषध

ईडीटीए चिलेटेड मिक्स मयक्रोन्यूट्रिऍंट ग्रेड-2 पन्नास ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साधारणतः पंधरा दिवसाच्या अंतरावर याच्या 2 फवारण्या कराव्यात. फवारणी केल्यास सोयाबीन पिवळे पडले असेल तर ती हिरवे होण्यास मदत मिळते. अशा प्रकारे तुम्ही याचा उपाय करू शकता.

महत्त्वाची सूचना (Important Notice) :- सदर फवारणी करण्या अगोदर जवळील कृषी सेवा केंद्र किंवा तज्ञ यांच्याशी संपर्क करून फवारणी करावी. सदरील माहिती फक्त ज्ञान व माहितीच्या आधारे दिली आहेत. यामुळे कोणतीही जबाबदारी लेखक किंवा वेबसाईट घेत नाहीत अशाच प्रकारे शेती संबंधित माहितीकरिता वेबसाईटला भेट देत रहा, धन्यवाद……

Soybean Pivli Padne Upay

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !