Soybean Yellow Mosaic Virus Marathi | सोयाबीन पिवळा मोझॅक माहिती, लक्षणे व फवारणी कोणती कशी कधी करावी ? जाणून घ्या !

Soybean Yellow Mosaic Virus Marathi :- नमस्कार सर्वांना, तुम्ही देखील सोयाबीन लागवड केली असेल आणि तुमच्या सोयाबीन पिकांवरती पिवळा मोझॅक चा अटॅक झाला असे. तर यावरून तुमचं पीक हे वाया जाऊ शकते,

पिवळा मोझॅक यापासून पिकाला वाचवण्यासाठी कोणती फवारणी आणि कशी करायची आहे ?. त्याचे लक्षणे ? पिवळा मोझॅक आहे काय ? हे कसे ओळखायचे आणि यावरती फवारणी कशी करायची माहिती पाहूयात.

Soybean Yellow Mosaic Virus Marathi

सोयाबीन पिवळा मोझॅक लक्षणे कशी ओळखायची ?

 • झाडांची पाने आकाराने लहान राहतात.
 • यामुळे पानांचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येतो, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकतात.
 • पानाचा शिराजवळ पिवळ्या रंगाचे डाग तुम्हाला दिसून येतात.
 • प्रादुर्भाव ग्रस्त झाडांचे वाढ पूर्णपणे खुंटते म्हणजे संपते.
 • पाने सुरकत्या पडून ती ओबडधोबड दिसायला लागतात.
 • लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पिवळे पडते, अशा झाडांना फुले व शेंगा कमी लागतात.
 • शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत, आणि आकाराने दाणे देखील लहान असतात.
 • यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येते.

सोयाबीन रोग वाहक किडीचे नियंत्रण कसे करायचे ?

रोगवाहक किडचे प्रतिबंधासाठी तुम्हाला शेतामध्ये निळे आणि पिवळे सापळे एकरी 25 याप्रमाणे पिकाच्या समक्ष उंचीवर लावायचे आहेत. म्हणजेच एक एकरसाठी निळे आणि पिवळे सापळे हे 25 याप्रमाणे तुम्हाला लावायचे

आहेत. उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी निंबोळी अर्क 5% किंवा अझाडिरेक्टीन (3000 पीपीएम) 1 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या (अर्थात गरजेनुसार) कराव्यात.

📝 हे पण वाचा :- आता मिळेल सगळ्यांना पशु क्रेडिट कार्ड शासनाचा नवा उपक्रम, अर्ज नमुना उपलब्ध त्वरित करा अर्ज !

सोयाबीन पिवळा मोझॅक फवारणी व काळजी ?

कोणतीही फवारणी किंवा कोणतेही रासायनिक फवारणी करण्यापूर्वी कृषी सेवा केंद्र किंवा तज्ञ यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर किंवा त्यांच्या

माहितीनुसार फवारणी करायची आहे. रासायनिक फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी नॅपसक पंपासाठी प्रमाण आहेत. कोणती फवारणी करावी ? याची माहिती खालील प्रमाणे आहेत.

सोयाबीन पिवळा मोझॅक रासायनिक फवारणी

(हे प्रमाण:- प्रतिलिटर पाणी नॅपसॅक पंपासाठीचे प्रमाण)

 • थायामेथोक्झाम (12.6 टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (9.50 टक्के झेडसी)
 • (संयुक्त कीटकनाशक) 0.25 मिलि किंवा बीटा सायफ्लुथ्रीन (8.49 टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड
 • (19.81 टक्के डब्ल्यू ओडी) (संयुक्त कीटकनाशक) 0.7 मिलि किंवा ॲसिटामिप्रीड (25 टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (25 टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) 0.25 ग्रॅम

📝 हे पण वाचा :- पॅन कार्ड हरवलं ? तत्काळ पॅन कार्ड हवंय ? मग मोफत या सरकारी वेबसाईटवर करा डाउनलोड !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *