Star Kisan Ghar Scheme | शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख रु. योजना सुरु

Star Kisan Ghar Scheme : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी बँका कर्ज देत असतात. याच योजनांमध्ये बँक ऑफ इंडियाने किसान घर योजना नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन घर बांधण्यासाठी, जुन्या घराची दुरुस्ती, साठी कर्ज दिलं जातं.

योजने बद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते तर आज बँक ऑफ इंडियाच्या योजनेची संपूर्ण माहिती लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

शेतकरी घर कर्ज योजना 2022 

शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतजमिनीवर नवीन शेती संरचना बांधण्यासाठी वित्तपुरवठा करणे. तसेच गोदाम, पार्किंग-कम-गॅरेज, बैल यासारख्या शेतीच्या कामांशी जोडलेल्या बहुउद्देशीय वापरासाठी शेड.  पात्रता :- KCC खाती असलेले शेतकरी कृषी उपक्रम/संलग्न कृषी कार्यात गुंतलेले लाभार्थी सदर योजनेचे लाभार्थी असेल. योजनेची संपूर्ण माहितीसाठी जवळील बँक ऑफ इंडिया बँक शाखेत संपर्क करवा.

स्टार किसान घर योजना काय आहे

सार्वजनिक क्षेत्रात प्रमुख बँका पैकी असलेली बँक ऑफ इंडिया आणि शेतकऱ्यांसाठी स्टार किसान घरी नावाची कर्ज योजना सुरु केली आहे.सदर योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांसाठी घर बांधण्यात पासून घराच्या दुरुस्ती पर्यंत त्याचबरोबर बैल शेतीच्या कामासाठी कर्ज दिले जाते.

स्टार किसान घर योजना पात्रता

सदर योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडियाच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा करून दिले आहे. आणि या योजनेअंतर्गत लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे. अशा शेतकऱ्यांना फॉर्म हाऊस बांधायचे असेल. किंवा त्यांना घराची दुरुस्ती व नूतनीकरण करायचे असेल किंवा शेतीसाठी कर्ज हव असेल.

तर या बँक ऑफ इंडियाच्या स्टार किसान (Star Kisan Ghar Scheme) योजनेचा नक्की आपण लाभ घेऊ शकता. बँक ऑफ इंडिया स्टार किसान घर योजना मुख्य पात्रता म्हणजे बँक ऑफ इंडिया मध्ये KCC खाते असेल तरच योजनेचा लाभ आपल्याला मिळेल. तसेच कृषी कार्यात गुंतलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा   

स्टार किसान योजना कर्ज मिळते

  • अ) नवीन शेत संरचना सह निवासी युनिट: मि. रु.1.00 लाख आणि कमाल रु.50.00 लाख.
  • ब) शेतीच्या संरचनेसह निवासी युनिटचे नूतनीकरण आणि दुरुस्ती: किमान रु.1.00 लाख आणि कमाल रु.10.00 लाख.
स्टार किसान योजना कर्ज व्याज दर

अधिस्थगन कालावधीसह जास्तीत जास्त 15 वर्षांच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड केली जाईल. व्याज दर स्लॅब ROI सध्या लागू ROI(MCLR @7.35%) एकूण मर्यादा रु. 3.00 लाखांपेक्षा जास्त आणि रु. 10.00 लाखांपर्यंत आणि समावेश. @1 वर्ष MCLR + BSS + CRP 1.50% 9.15% p.a. एकूण मर्यादा रु. 10.00 लाख. आणि त्याहून अधिक परंतु रु. 1.00 कोटींपेक्षा कमी (प्रवेश स्तर SBS-5) @ 1 वर्ष MCLR + BSS + CRP 2.25% 9.90% p.a.

स्टार किसान योजनेचे वैशिष्ट्ये

बँक ऑफ इंडियाच्या स्टार किसान घर योजनेत ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहेत. त्यांनाच स्टार किसान घर योजनेचा लाभ मिळेल. फक्त तेच शेतकरी ज्यांचे बँक ऑफ इंडियामध्ये KCC खाते आहे. हे लाभार्थी स्टार किसान घर योजना अंतर्गत कर्ज घेण्यास पात्र असतील. आणि या योजनेचा लाभ फक्त कृषी कार्यात गुंतलेल्‍या शेतकऱ्यांना मिळेल. स्टार किसान घर योजना अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आयटी रिटर्न सादर करण्याची आवश्यकता नाही.

स्टार किसान योजनांबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क कसा करावा

सदर योजनेचे संपूर्ण माहिती आपण बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशिअल वेबसाईट. वरती दिलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा हेल्पलाईन क्रमांक या वरती कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. समोर दिलेले टोल फ्री क्रमांक आपण यावर कॉल करू शकता किंवा बँक ऑफ इंडियाचा ऑफिशिअल वेबसाईट वरती. जाऊन त्याठिकाणी आपल्याला हेल्पलाईन नंबर दिसतील आपण कॉल करू शकता.

बँक ऑफ इंडिया हेल्पलाईन नंबर :- 1800 103 1906 

*अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजाना ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment