Starter Water Pump Technology | शेतातील मोटर पंप वारंवार जळतोय ? मग वापरा हे जुगाड मोटर जळणारच नाही, आणि मिळतील हे 4 फायदे लगेच वाचा माहिती !

Starter Water Pump Technology :- आज लेखात महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध गोष्टींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. आणि आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे. आणि त्यामध्ये आता शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करत आहेत.

परंतु अशावेळी लाईटची कमतरता किंवा अन्य काही कोणत्या गोष्टींमुळे तुमची मोटर जर वारंवार खराब होत असेल किंवा जळत असेल तर त्यासाठी तुम्हाला नेमके कोणत्या टेक्नॉलॉजी युज करायचे आहे, ही संपूर्ण माहिती किंवा नेमकी तुमची मोटर जळण्यापासून कशी वाचू शकता ही माहिती आज लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

Starter Water Pump Technology

नवयुवक शेतकरी बांधव आता विविध नवीन यंत्राचा किंवा नवीन विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती ही टेक्नॉलॉजीच्या आधारे खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेत आहे. छत्रपती संभाजी नगर तालुका पैठण गाव पाचोड खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील या युवकांनी स्मूथ स्टार्टर नावाचे उपकरण अर्थातच डिवाइस सुरू केला आहे.

या मुळे तुमची मोटर जळण्यापासून वाचणार आहे, तरी याचीच सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कुलदीप ने इलेक्ट्रॉनिक विषयात एमएससी ची पदवी घेतलेली आहे. त्यानंतर 2014 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील कंपनी मध्ये चार वर्षे नोकरी देखील केलेली आहे.

स्मुथ स्टार्टर टेक्नॉलॉजी

आता या शेतकरी युवा पुत्राने एक नवीन स्मुथ स्टार्टर नावाचा डिवाइस तयार केलेला आहे या डिवाइस चा कसा वापर होतो याची माहिती आपण पाहूयात. या उपकरणासोबत त्यांना एक आयटी क्षेत्रातील कंपनीकडून आपल्या गरजेनुसार मोबाईल ॲप विकसित केलेला आहे.

तुम्हाला डाऊनलोड करावे लागते, त्याला लॉगिन केल्यानंतर पासवर्ड द्यावा लागतो त्यामुळे स्टार्टर्स सर्व नियंत्रण शेतकऱ्यांच्या हाती येतं, तीन ते साडेसात एचपी ते दहा ते बारा एचपी क्षमता अशा दोन प्रकारच्या पंपांसाठी तयार करण्यात आलेला आहे.

Starter Water Pump Technology

📋 हेही वाचा :- तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !

स्टार्टर वॉटर पंप तंत्रज्ञान

पहिल्या प्रकारासाठी सुमारे दहा हजार रुपये ते दुसऱ्या पंपासाठी 15000 रुपये खर्च येतो. याकरणात थरिस्टर तंत्रज्ञान वापरलेले सर्व साधारणपणे पंप सुरू झाल्यानंतर त्याला हिसके बसण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. मात्र या उपक्रमात आरपीएमने नियंत्रित राहत असल्यामुळे कोणताही फिक्स बसण्याचा प्रकार मोटरला येत नाही.

त्यामुळे मोटर आरपीएम नियंत्रित असल्यामुळे मोटर हळुवार सुरू होते अनेक वेळी काही उपकरणाचे बेरिंग बुश जाण्याचे प्रकार देखील असतात. तसे काही या उपकरणात घडत नाही. शेतातील पंप जळायचं तो आत्ता थांबणार आहे.

Starter Water Pump Technology

📋 हेही वाचा :- घर हवंय ? पैसे नाही ? मग या बँक देतात स्वस्तात 40 वर्ष लोन, त्याचा EMI (हफ्ता) घर भाड्यापेक्षा कमी, त्वरित येथून मिळवा कर्ज वाचा डिटेल्स !

Starter Technology

उपकरणाला एलसीडी डिस्प्ले दिला असून त्यानुसार तापमान आणि अनुषंगाने पंपाला वीज पुरवठा करणारी केबल कुणी कापली किंवा त्यात छेडछाड केली तसे पंप मोबाईलवर तत्काळ संदेश मिळतो. हे ॲप मधील संबंधित बटन लाल रंगाचे होऊन त्वायात रिंग वाजते. यामध्ये जीपीएस सिस्टम बसवलेली आहे, पंपची चोरी झाल्यास त्याचा ठाव ठिकाण देखील शोदता येतो.

त्यासाठी उपकरणाला काही काळासाठी बॅटरी बॅकअपही त्यात दिला गेलेला आहे. अतिरिक्त सुविधा म्हणून वायरलेस सेंसर ही त्यात दिलेला आहे. अशा प्रकारे विविध सेंसर यामध्ये आहे, 5 ते 10 पंप यासाठी हे नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना मोठ्या दिलासा दिलेला आहे, यातून नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Starter Water Pump Technology
Starter Water Pump Technology

📋 हेही वाचा :-  मोबाईलमधून डिजिटल मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे वाचा सविस्तर माहिती मराठीत !

येथे खालील व्हिडीओ पहा सविस्तर माहिती समजेल !

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !