Thibak Sinchan Anudan Yojana 2021 | ठिबक सिंचनला 80% अनुदान नवीन GR

Thibak Sinchan Anudan Yojana

Thibak Sinchan Anudan Yojana 2021 | ठिबक सिंचनला 80% अनुदान नवीन GR

मित्रांनो नमस्कार, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन

योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना याआधी 55% टक्के अनुदान तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 45% टक्के अनुदान देय होत.
त्यानंतर दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

विभागाअंतर्गत निर्गमित करण्यात आला, त्यानंतर अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या ठिकाणी 80% टक्के अनुदान व

इतरसाठी 75% टक्के अनुदान असे अनुदान देय करण्यात आले, राज्यातील फक्त खालील दिलेल्या जिल्ह्यासाठी 80% टक्के

ते 75% टक्के अनुदान देय असणार आहे.

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन या पद्धतीत,

जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले

जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

25 ऑगस्ट 2021 शासन निर्णय

📢 दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी एक महत्वाचा शासन निर्णय कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:- येथे पहा 

सूक्ष्म सिंचन पद्धतीने सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे,

तर सन 2015-16 पासून सदर योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रती थेंब अधिक घटकांतर्गत राबविण्यात येत आहे

तरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना एकूण खर्चच्या

नवीन सुधारित माहितीनुसार 80% टक्के अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच इतर शेतकऱ्यांसाठी 75% टक्के अनुदान हे कमाल 5 हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंत देण्यात येते.

कोणाला मिळणार 80% अनुदान ? 

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना एकूण खर्चच्या नवीन सुधारित

माहितीनुसार 80% टक्के अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच इतर शेतकऱ्यांसाठी 75% टक्के अनुदान हे कमाल 5 हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंत देण्यात येते.

लाभ घेण्यासाठी पात्रता

मित्रांनो या योजनेमध्ये 80% टक्के अनुदान घेण्यासाठी तसेच 75% टक्के अनुदान घेण्यासाठी कोणती शेतकरी यामध्ये पात्र

असेल तर संपूर्ण माहिती बघूया तरी यामध्ये मित्रांनो 5 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत असलेले सर्व शेतकरी या अनुदानास पात्र असणार

आहे, त्याचबरोबर आपण अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी असेल तर आपल्यासाठी 80% टक्के अनुदान दिले आहे तसेच

इतर लाभार्थ्यांना 75% अनुदान असेल या योजनेस पात्र असेल तर या योजनेची जमीन मर्यादा 5 हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली

आहे आपण 5 हेक्टर च्या आत मध्ये असेल तर आपल्याला योजनेचा नक्की लाभ मिळेल.

लाभ घेण्यसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. ७/१२ प्रमाणपत्र
 2.  ८-ए प्रमाणपत्र
 3.  वीज बिल
 4.  खरेदी केलेल्या संचाचे बिल
 5.  पूर्वसंमती पत्र

लाभ घेण्यासाठी पात्रता

 1.  शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
 2.  शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 3.  शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 4.  जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला     पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत     कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
 5.  शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
 6.  सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
 7.  शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
 8.  शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते   शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड     कराव्यात.

कोणते जिल्हे पात्र ?

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके,

तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा एकूण २४४ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात

येत होती. या योजनमध्ये राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांचा समावेश केला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत  शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन

योजनेमध्ये देय असलेल्या अनुदानाशिवाय अल्प व  अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी २५ टक्के व इतर शेतकऱ्यांसाठी ३० टक्के

पुरक अनुदान राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदान देण्यात येते. (Thibak Sinchan Anudan Yojana 2021) मुख्यमंत्री

उध्दव ठाकरे यांनी आता ही योजना उर्वरित सर्व तालुक्यात राबविण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजने अंतर्गत अल्प व अत्यल्पभुधारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ८० टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देय राहणार आहे.


📢 पिक विमा मंजूर फक्त 6 जिल्ह्यांसाठी यादी आली:- येथे पहा 

📢 80% टक्के अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी online अर्ज असा करावा येथे पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !