Thibak Sinchan Online Form 2022 | 80% अनुदान ठिबक,तुषार ऑनलाईन अर्ज

Thibak Sinchan Online Form 2022 : नमस्कार सर्वाना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची बातमी आहे. सन 2021-22 यावर्षामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना करिता 200 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता ठिबक सिंचन, तुषार सिंचनसाठी 80 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

आपण याआधी शासन निर्णय पाहिलेले होते त्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या दोन्ही योजने मिळून या ठिकाणी अनुदान 80 टक्के आपल्याला दिले जाणार आहेत.

शेतकरी बांधवानो  आपणासाठी घेऊन आलोय  केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन  शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज  मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि रोज मिळवा नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा   

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना

सदर योजना अंतर्गत 200 कोटी रुपये निधी वितरीत करून आता. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच योजनेची अंमलबजावणी साठी शासन निर्णय 6 जानेवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त, नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. राबवण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती.

त्यानंतर सदर योजना सन 2021- 22 पासून राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय 18 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णयान्वये घेतलेला आहेत. अर्थातच राज्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आता ही योजना राबवण्यात येणार आहे. (Thibak Sinchan Online Form 2022) आणि यासाठी आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे.

ठिबक, तुषार 80% अनुदान कसे मिळणार

या योजनेअंतर्गत अनुदान कसे दिले जाणार आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या दोन्ही योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% टक्के अनुदान दिले जात होते.

आणि इतर शेतकरी (5 हेक्टर) मर्यादित आहे त्यांना 45% टक्के अनुदान देण्यात येत होतं. तर आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान. सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% ते 75% टक्के एकूण अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

Thibak Sinchan Online Form

तर याबाबत संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सन 2021-22 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.

सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 45% टक्के अनुदान. तर इतर लाभार्थ्यांसाठी 45 टक्के पाच हेक्टर पर्यंत मर्यादित असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

Thibak Sinchan Online Application Maharashtra

तसेच आता मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत पूरक अनुदान म्हणून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% .आणि इतर शेतक-यांना 30 टक्के पूरक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे. नोंदणी कशी करायची याबाबत संपूर्ण व्हिडिओ आपण बनवला आहे तो व्हिडीओ आपण पाहून घ्या.


📢 कुकुटपालन अनुदान 25 लाख रु. योजना सुरु :- येथे पहा 

📢 ८०% अनुदान ठिबक योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा 2022 :- येथे पहा 

Leave a Comment