Thibak Sinchan Online Form Kasa Bharava :- आजच्या या लेखामध्ये आपण शासनाच्या ठिबक, तुषार सिंचन योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, की शेतकऱ्यांना शासनाकडून किती अनुदान दिले जाते.
व त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा, कागदपत्र, पात्रता,अनुदान किती संपूर्ण माहिती पाहू, आणि इतर शेतकऱ्यांना देखील ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांनाही ठिबक सिंचन, तुषार सिंचन याची माहिती मिळेल.
ठिबक, तुषार सिंचन 80% अनुदानावर भरा ऑनलाईन फॉर्म
शेतकऱ्यांसाठी शासनाने नुकताच नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे, त्यानुसार आता शेतकऱ्यांना ठिबक,तुषार सिंचन साठी अनुदानात मोठी वाढ केली आहे.
सन 2015-16 पासून सदर योजना “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रति थेंब – अधिक पिक” घटकांतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी,
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 55% व इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान कमाल 5 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यत देण्यात येते. राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्येने ग्रस्त
जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास संदर्भाधिन शासन निर्णय दि. 19 ऑगस्ट, 2019 अन्वये मान्यता दिलेली आहे.
योजनेअंतर्गत अनुदान खालील प्रमाणे
या योजनेंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देय 55% अनुदानास 25% पूरक अनुदान देऊन एकूण 80% अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना देय 45% अनुदानास 30% पूरक
अनुदान देऊन एकूण 75% अनुदान अनुज्ञेय आहे.
📢 तुम्हाला माहिती का ? बँक, पोस्ट ऑफिस FD पेक्षा अधिक व्याज व परतावा येते मिळतो वाचा डिटेल्स घ्या लाभ ! :- येथे वाचा माहिती
📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा