Thibak Sinchan Yojana Maharashtra | पहा ठिबक, तुषार सिंचन 80% अनुदानावर किती मिळते एकरी अनुदान ? व करा ऑनलाईन अर्ज

Thibak Tushar Yojana

Thibak Sinchan Yojana Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने महत्त्वाची अशी योजना सुरू केली आहे.

आणि ती योजना म्हणजे ठिबक, तुषार सिंचन योजना या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 75 ते 80 टक्के अनुदान दिले जाते. तर हे अनुदान हेक्टरी किती मिळणार आहे?, एकरी किती मिळतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, शासनाचा शासन निर्णय, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Thibak Sinchan Yojana Maharashtra

सर्वप्रथम जाणून घेऊया की ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठी 80% अनुदान दिलं जातं. तर यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान हे दिल जात. तर यामध्ये 30% पूरक आणि 25% पूरक असा अनुदान दिलं जाते. आणि याच अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना याआधी 45 आणि 55% असे अनुदान दिले जात होतं.

हे अनुदान आता वाढून 75 ते 80 टक्के करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि राज्याचे मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 75% ते 80% अनुदानित दिले जाणार आहे. तर यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया.

ठिबक तुषार सिंचन योजना

आता जाणून घेऊया ठिबक सिंचन एक हेक्टर साठी लॅटरल अंतर मीटर मध्ये 1.2×0.6 खर्च मर्यादा यामध्ये 1 लाख 27 हजार 501 रुपये अनुदान 80% नुसार 1 लाख 20 हजार रुपये. अनुदान 75 टक्के नुसार 95 हजार 626 रुपये एवढा अनुदान आपल्याला मिळू शकत.

लॅटरल करिता 1.2×0.6). लॅटरल अंतर मीटर 1.5×1.5 करिता. खर्च मर्यादा 97,245 रुपये अनुदान 80% नुसार जवळपास 77 हजार 796 रुपय. अनुदान 75 टक्के नुसार 72 हजार 934 एवढा अनुदान मिळतं. लॅटरल अंतर मीटर मध्ये 5×5 करिता खर्च 39 हजार 378 रुपये अनुदान. 80 हजार नुसार 31,502 रुपये. तर अनुदान 75% नुसार 29,533 रुपये एवढा अनुदान मिळतं.

Thibak Tushar Yojana

येथे पहा योजनेची सविस्तर माहिती 

तुषार सिंचन योजना महाराष्ट्र 

सिंचन क्षेत्र करिता अनुदान पुढीलप्रमाणे आहे. 1 हेक्टर करिता तर यामध्ये खर्च मर्यादा 75mm करिता 24 हजार 194 रुपये. तर 80 टक्के अनुदानानुसार 19 हजार 355 रुपये, 75 टक्के अनुदानानुसार 18 हजार 145 रुपये. असा खर्च तुषार सिंचन 1 हेक्टरसाठी लागतो. तर त्यापैकी असे अनुदान आपल्याला मिळू शकत. तर यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?, या संदर्भातील कागदपत्रे, पात्रता व इतर संपूर्ण माहिती खाली पाहू शकता.

Thibak Tushar Yojana

हेही वाचा; ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठी 80% अनुदान व्हिडीओ येथे पहा


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top