Toilet Yojana Online Form :- नमस्कार सर्वांना. Sbm आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्वाचे आणि आनंदाची बातमी या लेखात आपण जाणून घेणार आहोत. ग्रामीण वैयक्तिक शौचालय योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे.
आपण वैयक्तिक शौचालय योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12000 हजार रु. शासनाकडून अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. आणि या बाबत परिपत्रक (sbm.gov.in registration) हे जाहीर करण्यात आलेले आहे.
Toilet Yojana Online Form
या लेखामध्ये आपण यासाठी म्हणजेच वैयक्तिक शौचालयसाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येईल. त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात, वेबसाईट कोणती आहे. यावर संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
वैयक्तिक शौचालय याबाबत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठीचे परिपत्रक दि. 23/05/2022 रोजी परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्या परिपत्रकाच्या अंतर्गत ग्रामस्थांनी ऑनलाइन द्वारे वैयक्तिक शौचालय बाबत मागणी करण्याबाबत शासन परिपत्रक आहे.
दिनांक 23/05/ 2022 रोजी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. तर स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत जे लाभार्थी कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध नाहीत. अशा कुटुंबांनी ऑनलाइन द्वारे वैयक्तिक शौचालय याची मागणी करता येणार आहे.

वैयक्तिक शौचालय अनुदान ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?
या संदर्भात माहिती कळविण्यात आली आहे, तर ऑनलाइन मागणीच्या अनुषंगाने कुटुंबाने खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहेत. म्हणजेच खाली दिलेल्या अटी, शर्ती, कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तर ते कोणकोणती आहेत याबाबत संपूर्ण माहिती खाली जाणून घेऊया.
वैयक्तिक शौचालय करिता ऑनलाइन अर्ज कसे करावे, यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे. त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. आणि आपण अर्ज सादर करू शकतात.
शौचालय करिता ऑनलाईन फॉर्म
तर सर्वप्रथम आपल्याला पुढे देण्यात आलेल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती बघायचा आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर वैयक्तिक शौचालय बांधणी करीत अर्ज त्यानंतर वितरणासाठी मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.
कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घेऊन राज्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी हातभार लावावा. असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे. याबरोबरच नोंदणी कशी करायची आहे, हे आपल्याला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये समजणार आहे.
वैयक्तिक शौचालयसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा व ऑफिशिअल वेबसाईट खाली देण्यात लगेच ऑनलाईन अर्ज करा
वैयक्तिक शौचालय ऑनलाईन अर्ज कागदपत्रे
- 1) उत्पन्न प्रमाणपत्र त्यानंतर
- 2) आधार कार्ड
- 3) बीपीएल कार्ड.
त्यालाच आपण रेशन कार्ड सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर महाराष्ट्र मधील कायम रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र म्हणजेच मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. इत्यादी कागदपत्रे ही वैयक्तिक शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात.
वैयक्तिक शौचालय यादी मध्ये आपलं नाव आहे का ? या यादीत लगेच आपले नाव पाहण्यासाठी वेबसाईटवर भेट द्या
📢 नवीन शेत जमीन खरेदी करा 100% अनुदानावर नवीन योजना सुरु :- येथे जाणून घ्या लगेच
📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म