Tomato Farming in Maharashtra :- शेतकऱ्यांनो शेती हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला कमावण्याची संधी कधी ना कधी देत असते. आणि यंदा असच झालं, यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लॉटरी लागली असं समजा. कारण टोमॅटो ने सध्या संपूर्ण मार्केट जाम केला आहे.
या टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचं नशीबच पालटल आहे. या टोमॅटोच्या लॉटरी मधून शेतकऱ्यांचं पूर्ण नशीबच पलटून गेलेला आहे. टोमॅटो लॉटरी मधून टोमॅटो उत्पादक शेतकरी ही कोट्यवधी झाले आहेत. अशा अनेक शेतकरी या टोमॅटो लॉटरी मधून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी कमवले आहे.
अशाच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक थोडक्यात यशोगाथा जाणून घेऊया. टोमॅटो शेतीतून कोट्यवधी उत्पन्न घेण्याऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील एका शेतकरीची यशोगाथा जाणून घेऊया.
Tomato Farming in Maharashtra
पाचघर हे गाव पुणे आणि नगर जिल्ह्यातील सीमेवर असलेलं गाव आहे, ग्रीन बेल्ट अशी जुन्नरची ओळख ही आहे. हे तुम्हाला माहीतच असेल आणि राज्यात सर्वाधिक धरण जुन्नर तालुक्यातच आहे. यामुळे गावाचा काय कायापालट झाला.
काळीभोर जमीन आणि वर्षभर पाणी यामुळे येथे कांदा, टोमॅटोची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता सध्या टोमॅटोला प्रचंड भाव असल्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे टोमॅटो आहे. या टोमॅटोने अनेक शेतकऱ्यांचे नशीबच पालटले आहे.
अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहूया. पाचघर च्या तुकाराम बाबुजी गायकर यांनी 18 एकर बागायती जमीन आहे. त्यातील 12 एकर वर यांचा मुलगा ईश्वर गायकर, आणि सून सोनाली यांच्या मदतीने टोमॅटोची शेती त्यांनी मोठ्या प्रमाणत केली होती.
टोमॅटो उत्पादक शेतकरी
गायकर यांनी टोमॅटो पिकाची लॉटरी लागली मागील महिनाभरापासून आजपर्यंत त्यांनी 13 हजार टोमॅटो कॅरेट विक्रीतून सव्वा कोटी रुपये पेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी यांच्या
टोमॅटो कॅरेटला 2100 रुपये 20 किलोचे कॅरेटला एवढा भाव यांना मिळाला. गायकर यांनी आज एकूण 900 टोमॅटो कॅरेट विकली केले आहे. आज एकाच दिवसात तब्बल 18 लाख रुपये त्यांना मिळाले आहेत.

✅ हेही वाचा :- एका एकरात लाखों रुपये कमवायचे का ? हे फळ करेल लखपती कराया फळांची लागवड, शासन ही देते अनुदान, पहा लागवड, खत, उत्पादन व ऑनलाईन फॉर्म !
टोमॅटो कॅरेटला आज भाव काय मिळतोय ?
मागील महिनाभर त्यांना कॅरेट ला प्रतवारीनुसार 1000 ते 2400 रुपये इतका भाव मिळाला, असल्याचं ते स्वतः सांगत आहे. टोमॅटो 20 किलोच्या कॅरेटला तब्बल अडीच हजार रुपये म्हणजेच 125 रुपये किलो इतका भाव मिळाला आहे.
अशामुळे ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहे, टोमॅटो उत्पादक शेतकरी लखपदी बनले आहे, तर आणि अनेक जन कोट्यवधी शेतकरी झाले आहेत. हा भाव इतिहासात एवढा प्रथमच मिळाला असल्यास देखील माहिती आहे. यामुळे आता शेतकरी कोट्यवधी होणार आहे.

✅ हेही वाचा :- तुम्हाला सर्वात महागडी भाजी माहिती का ? प्रति किलो 80 ते 1 लाख रु. भाव, अशी करा ही शेती व्हाल लखपती !