Tractor Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर व पावर टीलर अनुदान योजना लगेच अर्ज करा होणार निवड

Tractor Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व पावर टीलर अनुदान योजना सुरू झाली आहे. यासाठी 50% टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज देखील सुरू झाले आहेत. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा या लेखांमध्ये कागदपत्रे,पात्रता,अनुदान,ऑनलाईन अर्ज कसा करावा. याची संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना 2022

महाराष्ट्रात सुमारे ८०% शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. यांत्रिकीकरणासाठी लागणारे यंत्र/ औजारे शेतकरी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी करु शकत नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत कृषि यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कृषि विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान आणि एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमातंर्गत सुद्धा अल्प प्रमाणात यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तथापि, शेतकऱ्यांकडून कृषि यंत्र व औजारांकरिता असलेली मोठी मागणी विचारात घेऊन संदर्भाधीन शासन निर्णय दि.१२ सप्टेंबर, २०१८ अन्वये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेकरिता संदर्भाधीन शासन निर्णय क्र.२ अन्वये रु.९० कोटी निधीच्या कार्यक्रमास (Tractor Anudan Yojana 2022) प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली.

ट्रक्टर अनुदान योजना 2022

असून संदर्भाधीन शासन निर्णय क्र. ३ अन्वये या योजनेकरिता सन २०२१-२२ या वर्षात प्रथम दण्यात रु. ७५ कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे. कृषि आयुक्तालयाने संदर्भ क्र.४ येथील दि.०१ फेब्रुवारी, २०२२रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या निधी मागणीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन २०२१-२२ करिता वितरीत करावयाच्या उर्वरित निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. सन २०२५-२२ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रू.१५ कोटी (अमरी रुपये पंधरा कोटी फक्त) आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) वितरित करण्यात येत असून सदर निधी सन २०२१-२२ करिता खालील लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा. २. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महा डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात यावी.

कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 

३. सदर योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जम महिला, अल्प व अत्यला भू-धारक शेतक-यांसाठी किंमतीच्या ५०% किंवा रु.१.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यासाठी किंमतीच्या ४०% किंवा रु.१ लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात यावे. ४. इतर बाबींबाबत योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भाधीन दि. १२ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ५. सदर वितरित निधी कोषगारातून आहरित करण्याकरिता आयुक्त (कृषि) यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ६. सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांचा अनौ. सं. क्र.५६/२०२२/व्यय १.दि. ०४ मार्च, २०२२ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2022

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान उपलब्ध करुन देत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करणं आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लॉटरी पद्धतीनं शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. (Mahadbt Tractor Yojana 2022) महिला शेतकरी यांना 1 लाख ते 1.25 लाख तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 हजार आणि 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. 

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता 2022
 • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य
 • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा
 • शेतकरी अनुसूचित जाती,जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
 • या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतल्यास पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही.
 • मात्र, इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

👉👉200 गाई पालन योजना 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा👈👈

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे 2022
 • आधार कार्ड ७/१२ उतारा ८ अ दाखला
 • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन 
 • केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
 • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
 • स्वयं घोषणापत्र
 • पूर्वसंमती पत्र

👉👉ट्रॅक्टर पावर टीलर साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा👈👈


📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !