Tractor Anudan Yojana Maharastra 2021 | प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना 2021
योजनेची संपूर्ण माहिती
50% टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या लेखा मध्ये पाहणार आहोत यांत्रिकीकरण शेतकऱ्यासाठी काळाची गरज बनले कारण बैलाची उपलब्धता त्याची देखरेख करणे या सर्व गोष्टी आता शेतकऱ्यांना परवडत नाही नाही तसेच शेतीचे तुकडे (वाटणी) झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये यंत्राच्या अवजाराच्या साह्याने आधुनिक शेती करणं हे शेतकऱ्यांना अधिक सोयीचं होत चालल्याने शेतकऱ्यांना शेती करताना ट्रॅक्टर वर जास्त कल आपल्याला दिसत आहे.
शेती करता ट्रॅक्टर हा महत्वाचा ठरत चालला आहे याचा विचार करता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर (कृषी यांत्रिकीकरण) योजना राबविली जाते, तर आज आपण प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना 2021-22 योजने साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?, कागदपत्रे, पात्रता, अटी, शर्ती काय संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना अनुदान किती ?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% टक्के पर्यंत अनुदान ट्रॅक्टर खरेदी साठी यंत्र खरेदीसाठी दिले जातात पण गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमधून बातम्या पाहात आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेण्यासाठी 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे (Tractor Anudan Yojana Maharastra 2021) याच्यासाठी पी एम किसान ट्रॅक्टर योजना 2021 राबवली जाते, यामध्ये आपण जर पाहिलं बातमी वाचल्यानंतर खालील शेवटी लिहिलेलं असतं की अर्ज करण्यासाठी जवळच्या सीएससी (CSC) सेंटर मध्ये जायचे आपला 7 बारा 8अ उतारा जे काही कागदपत्रे त्या कागदपत्रांनुसार आपल्याला सादर करायचे आहे.
प्रधानमंत्री ट्रॅक्टर पात्र लाभार्थी
कोणते शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात,योजना महाराष्ट्रासाठी आहे का महाराष्ट्र मधील शेतकरी यांच्यासाठी अर्ज करू शकतात का तर हो याच्यासाठी महाराष्ट्रामधील शेतकरी अर्ज करू शकतात कारण आपण जर पाहिलं केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविली जाणारी योजना कृषी यांत्रिकीकरण योजना याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना या सर्व जे काही योजना आहेत या महाराष्ट्र शासनाने एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना अर्थात (महाडीबीटी) फार्मर पोर्टल वर टाकलेले आहेत जेणेकरून ज्या काही योजना राबवल्या जातील शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व पाहता येतातं या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज करता येतो, ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करायचा पावर ट्रेलर, साठी अर्ज कसा करायचा कृषी अवजारे साठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती Video व या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत.
अनुदान कसे दिले जाणार ?
यामध्ये 2 प्रकारांमध्ये अनुदान दिलं जातं 1) अनुसूचित जाती-जमातीचे लाभार्थी यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जातं याचं 2) अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी प्राधान्य दिलं जातं)
मात्र अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांना या ठिकाणी दिली जाणारी सबसिडी आणि इतर व प्रवर्गातील लाभार्थ्यांना दिली जाणारी सबसिडी यांच्यामध्ये फरक आहे, साधारणपणे आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त अनुदान किती प्रकारचा असतो एखादा 2 लाखाचा ट्रॅक्टर असेल तर त्याला मात्र त्या सबसिडीच्या 50% टक्के पर्यंत मिळेल म्हणजे (1 लाख रु. अनुदान)
अनुदान कसे मिळेल ?
साधारणपणे आपण जर पाहिलं तर कुठलाही ट्रॅक्टर असो यामध्ये छोटा ट्रॅक्टर, मोठा ट्रॅक्टर, असेल यांच्यामध्ये जास्तीत जास्त अनुदान किती द्यायचं नियम ठरविण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये (open) खुला प्रवर्गच्या लाभार्थ्याला जास्तीत जास्त ट्रॅक्टर अनुदान किती समजा एखादा 2 लाखाचा ट्रॅक्टर असेल तर त्याला मात्र त्या सबसिडीच्या 50 टक्केपर्यंत सबसिडी म्हणजे 1 लाख मिळेल तर हे एससीएसटीच्या लाभार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांची सबसिडी दिली जाते आणि ओपन कॅटेगिरी मधील जनरल कॅटेगरी मधील असतील अशा लाभार्थ्यांना 1 लाख रुपये पर्यंत सबसिडी दिली जाते अनुसूचित जाती-जमातीतील जनरल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेमध्ये लाभधारक होण्यासाठी 1 एकर जमीन कमीत कमी असणे गरजेच आहे,
प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना 2021
प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा ? त्याचबरोबर योजनेसाठी चे कागदपत्रे, पात्रता, व अटी,शर्ती, अर्ज कसा करावा त्याचा व्हिडिओ संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे तिथून आपण संपूर्ण माहिती ही वाचू शकता व व्हिडिओ पाहू शकता.
ऑनलाईन अर्ज कसा करावा व्हिडिओ ?
📢 प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 ऑनलाईन अर्ज कसा करावा ? Video येथे पहा
प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज लिंक ?
📢 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक:- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ९५% अनुदानावर योजना सुरू :- संपूर्ण माहिती पहा