Tractor Anudan Yojana Online Form :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना महाडीबीटी पोर्टल वर राबवण्यात येत आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे
तसेच कृषी यंत्र हे ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे, अनुदान वरती उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रांमध्ये व अल्प
अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे प्रात्यक्षिक व मनुष्यबळ विकास द्वारे भागीदारीमध्ये जागृतता निर्माण करणे हा कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश्य आहे.
Tractor Anudan Yojana Online Form
कृषी यंत्रे अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक द्वारे भागीदारांना कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहित करणे.
अनुदान देण्यात येणारे अवजारे व यंत्रे
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर,
- ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे,
- बैल चलित अवजारे,
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे,
- प्रकिया संच,
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयंचलित अवजारे
शेतकऱ्यांना खूशखबर, केंद्र सरकारच्या या ऍप वरून मिळवा डिजिटल सातबारा, सरकारने केले नवीन अँप लॉन्च !
योजनेचे अनुदान
अनुसूचित जाती व अनुसूचित जमती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% टक्के अनुदान व इतर व खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40% टक्के अनुदान वरील बाबी करीता देण्यात येणार आहे.
कोणते अवजारे अनुदान किती ?
- ट्रॅक्टर पॉवर टिलर चलीत अवजारे 20 बीएचपी पेक्षा कमी नांगर 3 प्रकार पडतात
- मोल्ड बोर्ड नांगर:- अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांना 50% अनुदान म्हणजे 20 हजार रु. सर्वसाधारण
- प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40% टक्के अनुदान म्हणजे 16 हजार रु.
- तव्याचा नांगर अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील साठी पन्नास टक्के अनुदान म्हणजे वीस हजार रुपये
- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 40% टक्के अनुदान म्हणजे 16 हजार रुपये.
- चीझल नांगर अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान म्हणजे 10 हजार रुपये
- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 40% टक्के अनुदान म्हणजे 8 हजार रुपये.
📋हेही वाचा :- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !
Tractor Yojana
अशा प्रकारे संपूर्ण अवजारांसाठी 50% अनुदान अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गासाठी व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40% टक्के अनुदान आहे. यामध्ये कोण कोणते अवजारे तसेच यंत्रे आहेत.
संपूर्ण माहिती पुढे दिलेल्या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहेत पीडीएफ डाऊनलोड करून आपण संपूर्ण अवजारे असतील त्याचा आपण लाभार्थी अनुदान किती आहे संपूर्ण पाहू शकता :- येथे पहा
कोणते ट्रॅक्टर किती अनुदान ?
ट्रॅक्टर अनुदान 2WD 8 ते 20 पीटीओ एचपी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी 50% टक्के अनुदान म्हणजे 1 लाख रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75 हजार रुपये अनुदान 40% टक्के,
20 एचपी पेक्षा जास्त 40 p.t.o. एचपी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील 50% टक्के अनुदान 1,25,000 सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40% टक्के अनुदान 1 लाख रुपये
40 पेक्षा जास्त ते 70 p.t.o. एचपी ट्रॅक्टर अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 1,25,000 व सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1 लाख रुपये
अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गासाठी 50% टक्के अनुदान व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40% टक्के अनुदान कोणते ट्रॅक्टर किती एचपी व किती अनुदान संपूर्ण हा :- PDF येथे पहा
योजनेच्या पात्रता
- शेतकऱ्यांची आधार कार्ड असणे अनिवार्य
- शेतकऱ्यांकडे 7/12 उतारा असणं आवश्यक
- 8 अ उतारा असणं आवश्यक
- शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा प्रमाणपत्र दाखला आवश्यक
- फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजारे साठी कुटुंबातील व्यक्तीच्या नावे टॅक्टर
- असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- एखाद्या घटकासाठी अवजारांसाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटकासाठी अवजारांसाठी पुढील 10 वर्ष अर्ज करता येणारनाही, परंतु इतर अवजारांसाठी अर्ज करता येईल.
उदाहरणार्थ:- एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टर साठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टर साठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन 2019-20 मध्ये इतर अवजारांसाठी लाभ पात्र राहील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- खरेदी करण्याच्या अवजारांचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेले तपासणी अहवाल
- जातीचा दाखला (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी)
- स्वघोषणापत्र पूर्व संमती पत्र
📢 सरकारची घोषणा, आता या शेतकऱ्यांना फक्त 18 हजार रुपयांत 7.5Hp सोलर पंप, नवीन कोटा उपलब्ध भरा ऑनलाइन फॉर्म ! :- येथे पहा
📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा