Tractor Anudan Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षासाठीट्रॅक्टर अनुदान योजना सुरू झाली आहे. राज्यातील सर्व कॅटेगरीतील सर्व शेतकरी पात्र असणार आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ, ट्रॅक्टर अनुदान योजना नेमकी काय आहेत. किती अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी कागदपत्रे पात्रता योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूया.
Tractor Anudan Yojana
ट्रॅक्टर अनुदान योजना सन 2022 मध्ये राबवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमध्ये 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी हे 2 प्रकार आहे. आणि त्याचमध्ये 8 Hp ते 70 Hp पर्यंत ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ही राज्यामध्ये सुरू झाली आहे.
अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील प्रवर्ग साठी अनुदान पुढीलप्रमाणे 8 Hp ते 70 एचपी नुसार राहील. अनुसूचित जाती जमातीतील 8 एचपी ते 20 एचपी साठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
टक्केवारी मध्ये 50% टक्के अनुदान असेल परंतु 1 लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान दिले जाणार नाही. 20 Hp पेक्षा जास्त ते 40 एचपी पर्यंत अनुदान 1 लाख 25 हजार रुपये दिले जाणार आहे.
40 पेक्षा जास्त ते 70 एचपी पर्यंत ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपये अनुदान असणार आहे. यापेक्षा जास्त अनुदान आपणास देय नाही. 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी यामध्ये अनुदान सारखेच आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र
खुल्या आणि इतर प्रवर्गासाठी 8 Hp ते 70 Hp साठी किती अनुदान असेल याबाबत संपूर्ण माहिती पाहुयात. या योजनेमध्ये 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी हे 2 प्रकार आहे. आणि त्याचमध्ये 8 Hp ते 70 Hp पर्यंत ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ही राज्यामध्ये सुरू झाली आहे.
खुल्या आणि इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 40% टक्के अनुदान देय आहे. सरकारच्या माहिती प्रमाणे 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 75 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
20 एचपी ते 40 एचपी यासाठी एकूण मर्यादा 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यापेक्षा जास्त अनुदान देय नाही. 40 एचपी ते 70 एचपी ट्रॅक्टर साठी एकूण अनुदान 1 लाख रुपये सरकारच्या माहिती प्रमाणे टक्केवारी 40 टक्के प्रमाणे आहे. परंतु यापेक्षा जास्त रक्कम दिली जाणार नाही असे
याठिकाणी पत्रकामध्ये देखील माहिती लिहिलेले आहे. कोणत्या अवजारासाठी, कोणत्या ट्रॅक्टरसाठी किती एचपी ट्रॅक्टरसाठी, कोणते यंत्रसाठी किती अनुदान आहे. याबाबतची सरकारने दिलेली पीडीएफ फाईल पाहण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर पहा :
ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
📑 हे पण वाचा :- शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे ? Rasta Magni Arj Pdf व मिळवा अर्ज करण्याची कायदेशीर माहिती एकाच ठिकाणी
ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
Tractor Anudan Yojana Online Apply
Pm Tractor योजना महाराष्ट्रासाठी आहे का ? महाराष्ट्र मधील शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात का तर हो याच्यासाठी महाराष्ट्रामधील शेतकरी अर्ज करू शकतात. कारण आपण जर पाहिलं केंद्र शासनाच्या माध्यमातून
राबविली जाणारी योजना कृषी यांत्रिकीकरण योजना. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना या सर्व ज्या काही योजना आहेत.
या महाराष्ट्र शासनाने एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना अर्थात (महाडीबीटी) फार्मर पोर्टल वर टाकलेले आहेत. जेणेकरून ज्या काही योजना राबवल्या जातील शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व पाहता येतातं या पोर्टलच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज करता येतो. ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पावर ट्रेलरसाठी अर्ज कसा करायचा. कृषी अवजारे साठी अर्ज कसा करायचा. संपूर्ण माहिती या Video मध्ये आपण पाहू शकता.