Trunk Fly Soybean Management :- नमस्कार सर्वांना. महत्वाचा अपडेट तर सोयाबीन उत्पादक आपण शेतकरी असाल तर आपल्यासाठी ही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखामध्ये सोयाबीन वरील खोडमाशींची व्यवस्थापन आपण कसे करू शकता. याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सततच्या रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावरती खोड माशींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

Trunk Fly Soybean Management
या खोड माशींचा व्यवस्थापन कसे करायचे आहे ?, ते याबाबत माहिती जाणून घेऊया. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. खोड माशींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात पुन्हा एकदा या ठिकाणी पडले आहेत. तर डॉक्टर पी.एस नेहरकर, डॉक्टर एलजी लाड, डॉक्टर योगेश म्हात्रे यांच्या माहिती त्या ठिकाणी आपण पाहूया. त्यांच्या व्यवस्थापनानुसार आपण या ठिकाणी खोडमाशींचा प्रादुर्भाव हा कसा रोखू शकतो.
खोड माशींचा व्यवस्थापन
निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१ हजार पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी. किडीची आर्थिक नुकसान पातळी : १० ते १५ % प्रादुर्भावग्रस्त झाडे. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच पुढीलखालील रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
फवारणी (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)
- थायामेथोक्झाम (१२.६) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी)
- (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि
- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा
- इथिऑन (५० ईसी) ३ मिलि किंवा
- इंडोक्झाकार्ब (१५.८० ईसी) ०.७ मिलि
- लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.६ मिलि
सूचना व टिप्स : कीटकनाशकाचे प्रमाण हाय व्हॉल्यूम पंपासाठीचे आहे. फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरावे. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. डॉ. योगेश मात्रे, (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा