Vidhwa Pension Yojana in Marathi | विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र | विधवा पेन्शन योजना अर्ज कसा करावा ? | श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

Vidhwa Pension Yojana in Marathi :- लाभार्थी पात्रता सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे. योजनेच्या प्रमुख अटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा

निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.

Vidhwa Pension Yojana in Marathi

किती पेन्शन मिळते ? प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते. अर्ज कसा करावा ? ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे अर्ज पहा अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो व तसेच आपले सरकार सेवा पोर्टल वर online अर्ज करू शकता.

Online अर्ज कसा करावा ? 

Online अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) या मध्ये आपण online अर्ज करू शकता किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल वर आपण online पद्धतीने अर्ज करू शकता तो अर्ज कसा करावा त्यासाठी पुढील :- Video येथे पहा

संजय गांधी निराधार अनुदान योजना 

अ क्रयोजनासविस्तर
1योजनेचे नावसंजय गांधी निराधार अनुदान योजना
2योजनेचा प्रकारराज्य पुरस्कृत योजना
3योजनेचा उददेशराज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
4योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नावसर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
5योजनेच्या प्रमुख अटीया योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
6दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुपया योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
7अर्ज करण्याची पध्दतअर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8योजनेची वर्गवारीआर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
9संपर्क कार्यालयाचे नावजिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय /Online अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) या मध्ये आपण online अर्ज करू शकता किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल वर आपण online पद्धतीने अर्ज करू शकता तो अर्ज कसा करावा त्यासाठी पुढील Video येथे पहा

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

अ क्रयोजनासविस्तर माहिती
1योजनेचे नावश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
2योजनेचा प्रकारराज्य पुरस्कृत योजना
3योजनेचा उददेशराज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन
4योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नावसर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
5योजनेच्या प्रमुख अटीगट (अ) :-65 व 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्याव्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.400/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.400/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहाअसे एकूण रु.600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.
गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.
6दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुपप्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
7अर्ज करण्याची पध्दतअर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतोयोजना/तलाठी कार्यालय /Online अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) या मध्ये आपण online अर्ज करू शकता किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल वर आपण online पद्धतीने अर्ज करू शकता तो अर्ज कसा करावा त्यासाठी पुढील:- Video येथे पहा
8योजनेची वर्गवारीनिवृत्तीवेतन
9संपर्क कार्यालयाचे नावजिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरवण्यात येतो?

यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु. 400/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु. 200/- प्रतिमहाअसे एकूण रु. 600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.

मला महाराष्ट्रात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन कसे मिळेल?

वयाची 65 वर्षे पूर्ण करणारे आणि 21000 रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या या अटींची पूर्तता करणाऱ्यांना 600 रुपये मासिक पेन्शन मिळण्यास पात्र आहे. ही पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

श्रावण बाळ योजना कागदपत्रे?

अर्ज, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा प्रमाणपत्र, वय पुरावा, रेशन कार्ड, इत्यादी

श्रावण बाळ योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील निराधार वृद्ध नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेली महत्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे या योजनेव्दारे महाराष्ट्र सरकार एक निश्चित रक्कम 600/- रुपये दर महिन्याला पेन्शन मिळेल.

विधवा पेंशन योजना कागदपत्रे मराठी?

लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, कायम रहिवासी प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक तपशील

महाराष्ट्रात विधवा निवृत्ती वेतन किती आहे?

महाराष्ट्रात विधवा निवृत्ती वेतन किती आहे? याद्वारे तुम्हाला दरमहा 600 ते 900 रुपये पेन्शन दिली जाईल. ही पेन्शन तुम्हाला थेट बँक खात्यात उपलब्ध करून दिली जाईल.

विधवा निवृत्ती वेतनाचे निकष काय?

पेन्शन योजनेंतर्गत पेन्शनचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील विधवांसाठीच उपलब्ध आहे. विधवेचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलेने एखाद्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यास ती योजनेतील लाभांसाठी पात्र राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *