Vihir Anudan Yojana Online Form Kasa Bharava :- शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विविध बाबींसाठी अनुदान दिलं जातं त्यामध्ये नवीन विहीर,
जुनी विहीर दुरुस्ती, बोरिंग वीज जोडणी आकार, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, व तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप, परसबाग, या बाबीवर अनुदान दिल्या जातं.
याच योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेमध्ये कोणकोणत्या बाबीसाठी किती अनुदान असेल कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ? पात्रता काय आहेत ऑनलाइन अर्ज कसा करावा ? संपूर्ण डिटेल मध्ये माहिती लेखांमध्ये पाहणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- नवीन विहीर
- जुनी विहीर दुरुस्ती
- इनवेल बोअरिंग
- वीज जोडणी आकार
- शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण
- सूक्ष्म सिंचन
- ठिबक सिंचन
- तुषार सिंचन
- पीव्हीसी पाईप
- परसबाग
योजनाचे अनुदान
- नवीन विहीर रुपये 2 लाख 50 हजार रु.
- जुनी विहीर दुरुस्ती साठी 50 हजार रु.
- इनवेल बोअरिंग 20 हजार रु.
- पंप संच 20 हजार रु.
- वीज जोडणी आकार 10 हजार रु.
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख रु.
- सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन संच 50 हजार रु.
- तुषार सिंचन संच 25 हजार रु.
- पीव्हीसी पाईप 30 हजार रु.
- परसबाग 500 रु.
या बाबीवर अनुदान देय आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट :- येथे पहा
सूचना :- सदर योजना मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.
लाभार्थी पात्रता
- लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
नवीन विहीर आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
- 7/12 व 8-अ चा उतारा
- तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
- लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
- कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
- गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
- ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
- ग्रामसभेचा ठराव.
जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग
- सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
- तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
- जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
- ग्रामसभेचा ठराव.
- तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
- लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
- कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र.
- गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
- ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
- इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच
- सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
- तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
- जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
- तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
- ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
- शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
- काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
- विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
- प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
📢 नवीन सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा