Wildlife Attack Compensation | आता शेतकरी असो किंवा जनावरे मिळणार 20 लाख रु. पर्यंत नुकसान भरपाई नवीन जीआर आला पहा खरी माहिती

Wildlife Attack Compensation :- आजच्या लेखांमध्ये महत्त्वाचं अपडेट, तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत अपंग जखमेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये कोणकोणते प्राणी कडून हल्ला झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अर्थसहाय्य मिळणार आहे. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

Wildlife Attack Compensation

यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे या हल्ल्यात मनुष्याने झाल्यास या ठिकाणी भरपाई देण्यात येते. तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी पशुधनाचा मृत किंवा अपंग/ जखमी झाल्यास त्यांना देखील या ठिकाणी भरपाई देण्यात येते. तर यामध्ये कोणाला किती अर्थसहाय्य हे दिले जाणार आहे. शासन निर्णयाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

वन्यजीव हल्ल्याची भरपाई

यामध्ये सर्वप्रथम व्यक्तिचा मृत्य झाल्यास किंवा कायम अपंग झाल्यास जखमी झाल्यास खालील प्रमाणे अर्थसहाय्य हे देण्यात येते. तर यामध्ये सर्वप्रथम व्यक्ती चा मृत्यू झाल्यास यांना 20 लाख रुपये. दहा लाख रुपये हे मृत्यू झालेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेश द्वारे आणि उर्वरित दहा लाख रुपये हे त्यांच्या राष्ट्रीय बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या. व संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम म्हणजेच फिक्स डिपॉझिट या ठिकाणी जमा केली जाईल. महत्त्वाचा हा शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे.

कोणाला किती मिळेल भरपाई 

यामध्ये व्यक्ती कायम अपंग झाल्यास 5 लाख रुपये, या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास एक लाख 25 हजार रुपये या ठिकाणी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. आणि यामध्येच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च या ठिकाणी देण्यात येणार आहे. मात्र खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे या ठिकाणी आवश्यक. त्याची मर्यादा 20 हजार रुपये आहे. तर यामध्ये प्रति व्यक्ती हे असणार आहे. तर यासाठी आपल्याला औषध उपचार घेण्यासाठी शासकीय व जिल्हा परिषद रुग्णालयातच या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर आता पशुधन मृत्यू अपंग जखमी झाल्यास त्यांना किती नुकसान भरपाई मिळेल या ठिकाणी आपण पाहूया.

वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई 

गाय, म्हैस, बैल, यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या 75% किंवा 70 हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम या ठिकाणी लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. तसेच मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास वन्यजीव संरक्षण (wildlife compensation act) अधिनियम 1972 मधील कलम 2 (18 अ) प्रमाणे या ठिकाणी असणार आहे. तर यामध्ये 75 टक्के म्हणजे बाजार भावाच्या किमतीच्या 75 टक्के किंवा पंधरा हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर यामध्ये गाय, म्हैस, बैल, जनावरांचा कायम अपंग झाल्यास या ठिकाणी 15000 रुपये पर्यंत दिले जाऊ शकतात.

वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई जीआर 

तसेच गाय,म्हैस, बैल, मेंढी, बकरी, तर पशुधन जखमी झाल्यास 25% रक्कम या ठिकाणी दिले जाणार आहे. म्हणजेच 5 हजार रुपये पर्यंत या ठिकाणी आपल्याला भरपाई मिळते. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा जीआर शासनाने घेतलेला आहे. हा जीआर आपल्याला पाहायचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे त्यावर जीआर (GR) पाहू शकतात. (compensation for crop damage due to wildlife attack)

Wildlife Attack Compensation

येथे पहा शासन निर्णय 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment