NTC Gharkul Yojana :- लातूर जिल्ह्यातील भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजासाठी राबवण्यात आलेली आहेत. घरकुल योजनेत पात्र झालेल्या 833 वैयक्तिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 9 कोटी 99 लाख 60 हजार रुपयांचा निधी वर्ग केला जाणार आहे.
याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 07/02/2023 रोजी घेण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्याची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आली होती.
NTC Gharkul Yojana
याच यादी मध्ये निवड झालेल्या 833 वैयक्तिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे घरकुलाचे बांधकाम ज्या टप्प्यावरती असेल. त्या टप्प्यानुसार या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे.