E Pik Pahani Status Check Kase Karayche | मोबाईलमधून ई-पीक पाहणी कशी करावी ? | ई पीक पाहणी झाली हे कसे चेक करावे ? पहा हा खास व्हिडीओ !

E Pik Pahani Status Check Kase Karayche :- शेतकरी बांधवांना आता स्वतःचा पिकपेरा नोंदवण्यासाठी राज्य सरकार पुरेसे प्रयत्न करत आहे. याचाच प्रयत्न म्हणून ई पीक पाहणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकरी शेताच्या बांधावरून किंवा शेतातून थेट आपल्या पिकांचा पेरा हा सातबारावर नोंदवू शकता.

यासाठी ई-पीक पाहणी सुरू करण्यात आले आहे. आता ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड अर्थात ई-पीक पाहणीचा हे ॲप्लीकेशन अपडेट झाले आहे. त्यामुळे प्लेस्टोर वर जाऊन तुम्ही नवीन ई पीक पाहणी ऍप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.

E Pik Pahani Status Check Kase Karayche

तुम्ही ई पीक पाहणी न केल्याने अनेक नुकसान तुमचे होऊ शकतात. सर्वप्रथम तुम्हाला पिक विमा, नुकसान भरपाई, शासनाच्या योजना तसेच सातबारा हा कोरा देखील राहू शकतो. तेव्हाही इ पीक पाहणी करणे फारच गरजेचे आहे.ई-पिक पाहणी करण्याकरिता तुमच्याकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी स्वतःच्या मोबाईल मधून कसे करायचे आहे ? आणि ई-पीक पाहणी कशी करावी नवीन पद्धत आहे. तुम्हाला ई-पीक पाहणी करायची असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायचे व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे.

ई-पीक पाहणी स्टेटस कसे चेक करावे?

ई-पीक पाहणी ऑनलाईन स्टेटस चेक कसे करावे ? :- ई-पीक पाहणी झाल्यानंतर ही तुमच्या सातबारावर अपलोड होण्यासाठी तलाठी यांच्या कार्यालयाकडे जाते. त्यानंतर तलाठी ई-पीक पाहणी मध्ये करण्यात आलेली संपूर्ण माहिती खरी असेल तर ते व्हेरिफाय करून थेट

पिकाची माहिती पड झाडे, बांधावरील झाडे, पडीक जमीन, कायम नोंद, ही माहिती सातबारावर अपलोड करत असतात. त्यामुळे ई-पीक पाहणी झाली किंवा नाही ? हे स्टेटस पाहणे तुम्हाला फारच गरजेचे आहे.

Epik Pahani App Version 2 Download

ई-पीक पाहणी करण्यासाठी शासनाने सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणीचे एप्लीकेशन अर्थात स्मार्टफोन एप्लीकेशन हे दिला आहे. या माध्यमातून शेतकरी शेतातून थेट आपल्या पिकाचे किंवा बांधावरील झाडांची नोंद थेट सातबाऱ्यावर वर करू शकतो.

असे हे ई पीक पाहणी एप्लीकेशन आहे. शासनाच्या माध्यमातून याला वेळोवेळी अद्यावत अर्थातच अपडेट केलं जातं। आणि हे अपडेट केल्यानंतर अपडेट केलेले एप्लीकेशन आपल्याला मोबाईल मधून किंवा प्ले स्टोर मधून याला अपडेट करावे लागते.

अपडेट म्हणजेच जे नवीन वर्जन हे तुम्हाला मिळवावे लागते. त्यानंतर ई-पीक पाहणी मध्ये किंवा त्या ॲप्लिकेशन मध्ये जे काही बदल झाले आहे तेही बदल तुम्हाला दिसून येतात. ई पीक पाहणी करण्यासाठीची ज्या काही अडचणी आहेत किंवा जो काही प्रॉब्लेम येत होता.

हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल झालेला असतो. आणि त्यामुळे ई पीक पाहणी करणे यात सोपं होते. त्यामुळे ई पीक पाहणीचं नवीन व्हर्जन हे अपडेट केलेला आहे. तर अपडेट केलेले व्हर्जन 2 थेट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील प्ले स्टोरची लिंक देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन थेट अधिकृत एप्लीकेशन तुम्ही डाऊनलोड करू शकता.

येथे क्लीक करून Epik Pahani App Version 2.0.11 Download प्ले स्टोर वरून डाउनलोड करा !

ई-पीक पाहणी App माहिती

ई-पीक पाहणी केल्यानंतर काही दिवसात ई-पीक पाहणी केल्याची यशस्वी माहिती तुम्हाला स्वतः वैयक्तिक चेक करावे लागते. यासाठी सर्वप्रथम ई-पीक पाहणी वर्जन – 2 हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करून घ्या.

त्यानंतर इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायचे आहे. भरल्यानंतर लॉगिन करून घ्या, नंतर गावाची, खातेदारांची नावे, असा पर्याय दिसेल. त्यानंतर संपूर्ण गावातील शेतकरीनिहाय, गट क्रमांक, ही संपूर्ण माहिती दिसते.

📑 हे पण वाचा :- अरे वा, आता ज्येष्ठ नागरिक कार्ड काढता येणार ऑनलाईन अगदी 5 मिनिटांत, बघा हा व्हिडीओ !

ई-पीक पाहणी झाली की नाही कसे चेक करावे ?

ई-पीक यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांची यादी समोर येईल. ज्या नावासमोर हिरव्या रंगांमध्ये दिसून येत आहे. त्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली असावी, असं समजावं. त्या ठिकाणी तुमची कोणताही तपशील तुम्हाला मिळत नसेल, तर तुमची ई-पीक पाहणी झालेली नसेल.

अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण गावातील ई-पीक पाहणी यशस्वी झाली का ? कोणी किंवा अजून केलीच नाही ही माहिती तुम्हाला मिळते. ही माहिती तुम्हाला समजत नसल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ तो संपूर्ण पाहू शकता.

Leave a Comment