Gogalgai Niyantran Kase Karave | शंखी गोगलगाय नियंत्रण नियोजन कसे करावे ? | शंखी गोगलगायी नियोजन व नियंत्रण कशा प्रकारे करावे ? जाणून घ्या कामची माहिती

Gogalgai Niyantran Kase Karave :- यंदा राज्यात विविध पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. आणि आता या वर्षात शंखी गोगलगायी च मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता पाहिला पाऊस सर्वत्र जवळपास पडलेलाच आहे,

आता पहिल्या पावसातच शंखी गोगलगाय नियंत्रण नियोजन कसे करावे ?, नियंत्रण म्हणजेच पिकांवर येण्यापासून आपण कसे त्या रोखू शकतो. कसे नियंत्रणात आणू शकतो. त्यासाठी कोणकोणती प्रक्रिया तुम्हाला करायची आहे ? याची माहिती जाणून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Gogalgai Niyantran Kase Karave

तुम्हाला माहीतच असेल की मागील गेल्या वर्षी मराठवाड्यात बऱ्याच भागांमध्ये सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव आढळून आला होता. सोबतच राज्य शासनाने यावर मोठ्या प्रमाणात अनुदान देखील देण्याचा निर्णय किंवा भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

उस्मानाबाद, लातूर, बीड, जिल्ह्यातील एक लाख सहा हजारावर शेतकऱ्यांचे 63 हजार 870 हेक्टर पिकाचे 33% पेक्षा जास्त शंखी गोगलगायी मुळे नुकसान झाले होते. आता शंखी गोगलगायी आधिक थंड व अति उष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापद्र्याने बंद करून झाडाला किंवा भिंतीला चिटकून सुप्त अवस्थेत जातात.

शंखी गोगलगाय नियंत्रण नियोजन कसे करावे ?व्यक्तिगत न करता सामुहिक योजना राबवावी !
गोगलगायी नियंत्रण व उपायोजना ?पहिला पाऊस पडल्यावर सर्व नदी, नाले, ओढे, येथील गोगलगाय नष्ट करावे
गोगलगायी उपायोजना ?  शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने एक ते दोन फुटाची चर काढावेत
शंखी गोगलगाय नियंत्रण नियोजन कसे करावे ? pdfयेथे क्लिक करून कृषी विद्यापीठ अकोला pdf डाउनलोड करा

शंखी गोगलगाय नियंत्रण उपायोजना काय कराव्यात ?

त्यामुळे गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात सक्रिय होऊन रोप अवस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. येणाऱ्या हंगामात मागील वर्षी प्रमाणेच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. आता एक व्यक्तीगत शेतकऱ्यांनी या उपायोजना करून उपद्रव पूर्णपणे दूर होत नाही. सामूहिकरीत्या उपाययोजना करण्याची यात गरज असते.

त्यामुळे ज्या ठिकाणी पहिला पाऊस पडला आहे, त्या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी मोहीम राबवून नदी, नाले, ओढे, ओहळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेल्या सकल भागात सुप्त अवस्थेत असलेल्या गोगलगयी गोळा करून नष्ट करावे.

Gogalgai Niyantran Kase Karave

✅ हेही वाचा :- सोयाबीन लागवड केली का ? सोयाबीन धोक्यात असे करा गोगलगाय नियंत्रण वाचा नियंत्रण माहिती

गोगलगायी नियंत्रण व उपायोजना ?

त्याचबरोबर मागील वर्षीच्या गोगलगायी प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने एक ते दोन फुटाची चर काढावेत. आणि त्याचबरोबर शेत किंवा बागेच्या सभोवती बांधपासून आत मध्ये आठ किलो प्रती एकर याप्रमाणे तंबाखू भुकटीचा कोरड्या राख्याचा अथवा चुन्याचा दहा सेंटिमीटर रुंदीचा पट्टा गोगलगायींना

शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून नियंत्रणासाठी टाकावे. जेणेकरून यापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण पिकांना होणार आहे. असे नियंत्रण तुम्हाला करायचे आहे. आणि यासोबतच जर अंड्याचा टरफलचा चुरा, कोरडी राख, तांब्याची पट्टी, अथवा जाळी, बोरीक पावडरचा वापर गोगलगायी व्यवस्थापनासाठी करता येत असतो.

Gogalgai Niyantran Kase Karave

✅ हेही वाचा :- सोयाबीन पिकाला फवारणी कशी व कोणती करावी ? सोयाबीन पिकाला आधिक फुल, शेंगा धारणा करिता ही फवारणी करा पहा सविस्तर

How to control snails

सायंकाळी किंवा सुर्यास्त पूर्वीच गोगलगायीना हात मोजे घालून आणि तोंडावर मास लावून गोगलगायी गोळा करून नष्ट करावे. जैविक व्यवस्थापनामध्ये एकरी 8 किलो लिंबोळी पावडर, 21 किलो निंबोळी पेंड, पाच किलो निंबोळी अर्क, या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यावर गोगलगायींना शेतात येण्यापासून रोखता येते.

अशा प्रकारे तुम्ही आतापासूनच एकत्रपणे प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात जेणेकरून शंखी गोगलगायी पासून होणारे नुकसान तुम्हाला टाळता येतील. यासंबंधी माहिती आणि संशोधन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून देण्यात आले, अधिक माहिती करिता तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या, किंवा कृषी विद्यापीठ अकोला यांचे pdf फाइल खाली दिली आहेत डाउनलोड करा.

Gogalgai Niyantran Kase Karave

✅ हेही वाचा :- येथे क्लिक करून मिळवा अकोला कृषी विद्यापीठ गोगलगाय नियंत्रण pdf

FAQ

गोगलगाय नियंत्रण कसे करावे ?

गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.

गोगलगाय नियंत्रण उपाय ?

गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. 

गोगलगाय उपायोजना काय कराव्यात ?

सायंकाळी किंवा सुर्यास्त पूर्वीच गोगलगायीना हात मोजे घालून आणि तोंडावर मास लावून गोगलगायी गोळा करून नष्ट करावे. जैविक व्यवस्थापनामध्ये एकरी 8 किलो लिंबोळी पावडर, 21 किलो निंबोळी पेंड, पाच किलो निंबोळी अर्क, या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यावर गोगलगायींना शेतात येण्यापासून रोखता येते.

गोगलगाय नियंत्रणासाठी उपाय किंवा औषधी ?

अंड्याचा टरफलचा चुरा, कोरडी राख, तांब्याची पट्टी, अथवा जाळी, बोरीक पावडरचा वापर गोगलगायी व्यवस्थापनासाठी करता येत असतो.