Snake Bite Cow Symptoms | तुमच्या गाई, म्हशींना, जनावरांना साप चावला तर कसे ओळखाल ? जाणून घ्या कामाची माहिती तात्काळ !

Snake Bite Cow Symptoms :- नमस्कार सर्वांना, अतिशय महत्वाची माहिती जाणून घेऊया. तुमच्याकडे देखील पशु असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जनावरांना जर साप चावला तर कशा पद्धतीने तुम्हाला साप चावला आहे किंवा नाही हे ओळखावे हे यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे हे जाणून घेऊया.

तुम्हाला माहितच आहे की स्पर्शदंश हा धोका सध्या मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांना देखील होत आहेत. आणि यात तुम्हाला गाय किंवा म्हैस गोठ्यात बांधलेले असतील, तर अशा गोठ्याच्या अवतीभवती अस्वच्छ असेल किंवा जास्त गवत किंवा जास्त पाणी तुंबलेला असेल तर अशावेळी ते गवत वाढलेले असेल.

Snake Bite Cow Symptoms

अशा ठिकाणी साप आडोसा घेऊन राहण्याची शक्यता जास्त राहते. आणि याच कारणांमुळे जनावरांना किंवा गाई म्हशींना हा सर्पदंश होतो. आता यामध्ये बऱ्याचदा जनावरांच्या पायाला किंवा तोंडाला, मानेवर सर्पदंश होण्याची शक्यता असते.

यावेळी सापाने चावा घेतल्याच्या खुणा जर तुम्हाला लक्षात आले नाही तर जनावरांच्या मज्जा संस्थावर याचा परिणाम होऊन जनावरांची श्वन प्राक्रिया बंद होण्याची शक्यता असते. काही महत्त्वाचे टिप्स आहे किंवा माहिती आहे हे तुम्हाला असणे गरजेचे आहे.

सापांचा आकार :- सापांचा आकार मोठा असेल तर जनावरांच्या शरीरामध्ये विष पसरण्याची शक्यता किंवा क्षमता जास्त असते. हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

📝 हे पण वाचा :- अरे वा 10 हजार गुंतवणूक करून 32 लाख कमावण्याची ही सरकारी योजना देतंय संधी ! पहा कोणाला कसा मिळेल लाभ ?

जनावरांना किती वेळा साप चावला ?

जेव्हा जनावरांना किंवा गाईंना पहिल्यांदा साप चावतो तर त्याची तीव्रता जास्त असते. व त्यानंतरचे काही साप चावा घेतो तेव्हा त्याचा दंश कमी असते.

जनावरांचा प्रकार :- साप चावण्याचा किंवा विष पसरण्याची तीव्रते जनावरांच्या प्रकारावर देखील ठरते. यात उदारणार्थ पाहायला गेलं, तर शेळीमध्ये गाय किंवा म्हशीपेक्षा सर्पदंश पसरणाचे प्रमाण जास्त असते. शेळी आकाराने लहान असल्यामुळे साप जर चावला तर लवकरच विष शरीरात पसरते.

जनावरांचे वय :- तरुण जनावरांच्या तुलनेत वयस्कर असलेल्या जनावरांमध्ये विष कमी कालावधीत पसरते.

सापाने चावा घेतलेली जागा :- सापाने गाय, म्हैस, शेळीला दंश घेतला आहेत, ती जागा ह्रदय, मेंदूच्या जवळ असेल तर सर्पदंशाची परिणामकारकता जास्त असते. गाईला किंवा म्हशीला साप चावला असेल किंवा अन्य जनावरांना चावला असेल तर त्याचे निदान किंवा कसं करायचं आहे हे महत्त्वाचं ठरतं.

ज्या जनावराला स्पर्शदंश झाला तर ते जनावर अस्वस्थ आणि बेचन होते, एक सारखे डोके हलवत राहते, तसेच पाय देखील झटकायला लागते, उड्या मारू लागते. गाई म्हशील किंवा अन्या जनावरांना साप चावला तर कोणती उपाय करून तुम्हाला ते कंट्रोलमध्ये करता येते ?

जनावरांना साप चावला ही कळल्यानंतर जोपर्यंत पशुवैद्यकीय येत नाही तोपर्यंत जनावरांच्या शरीरात विष पसरू नये यासाठी उपाययोजना करावी.सर्वप्रथम ज्या ठिकाणी साप चावला या ठिकाणी वरील बाजूस दोरीने घट्ट बांधावे, असे केल्यामुळे शरीरामध्ये विष पसरण्याचे प्रतिबंध निर्माण होतो. ज्या ठिकाणी साप चावा घेतला अशा ठिकाणी नवीन निर्जतूक ब्लेडने कापावे किंवा काप घ्यावा.

📝 हे पण वाचा :- काय सांगता ? फक्त 115 महिन्यांत पोस्टाची ही योजना करते पैसे दुप्पट फक्त असा घ्या लाभ त्वरित !

परंतु काप देताना तो जास्त खोल देऊ नये अशा पद्धतीने काप दिल्यास शरीरामध्ये विष न पसरता दे रक्त प्रवाह सोबत बाहेर निघून जाण्यास मदत होते. जेव्हा सापाने चावा घेतलेल्या जखमीतून पुरेसा रक्तप्रवाह झाले नंतर त्यावर पोटॅशियम परक्युमेंट लावून घ्यावे.

त्यामुळे रक्तप्रवाह आटोक्यात आणण्यास मदत होते. अशा पद्धतीने जनावरांना साप चावला तर अशा पद्धतीने निदान करावे, आणि काळजी घ्यावी. आणि पशुवैद्यकीय यांना संपर्क करून त्यांना बोलून घेऊन ट्रेटमेंट करावी धन्यवाद…..

1 thought on “Snake Bite Cow Symptoms | तुमच्या गाई, म्हशींना, जनावरांना साप चावला तर कसे ओळखाल ? जाणून घ्या कामाची माहिती तात्काळ !”

Leave a Comment