Kapus Bond Aali Rokhnyasathi Upay | गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी किती कामगंध सापळे लावावी ? | कापशीवरील बोंड अळी उपाय | गुलाबी बोंड अळी माहिती मराठी | गुलाबी बोंड अळी रोखण्याचे उपाय कोणते ?

Kapus Bond Aali Rokhnyasathi Upay :- शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची ही बातमी आहे. कापुस बोंड अळीला (कापशीवरील बोंड अळी) ला रोखण्यासाठी फवारणी या व्यतिरिक्त कोणती उपाय आहेत का ? आणि उपाय असेल तर ते नेमकी कसे करायचे आहेत ?.

त्यावरून किती बोंड अळी कंट्रोल होते ? ही संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी जाणून घेऊया. यंदा कपाशीची लागवड योग्य वेळी न झाल्यामुळे बोंड आळी ला खाद्य उपलब्ध होत आहे. आणि या सोबतच यंदा वातावरण देखील ढगाळ पाहायला मिळत आहे.

Kapus Bond Aali Rokhnyasathi Upay

यामुळे बोंड अळीच संकट येण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकरी बांधवांनी गुलाबी बोंड आळी ला रोखण्यासाठी कपाशी पिकामध्ये कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ असल्याचं सांगितल्या जात आहे.

आत्तापासूनच निरीक्षण करून गुलाबी बोंड अळीला रोखता येईल ? हे कामगंध सापळे कसे लावायचे याशिवाय बोंड अळीचे कमी खर्चात सोप्या पद्धतीने नियंत्रण कसं करायचं ही संपूर्ण माहिती पाहूयात.

सर्वप्रथम ज्या ठिकाणी कपाशी योग्य वेळेवर लागवड झाली आहे ? अशा ठिकाणी कापसाला पाते, फुले आणि काही प्रमाणात लागलेच दिसून येत आहे. अशा ठिकाणी ढगाळ वातावरणात मुळे गुलाबी बोंड अळीचे पतंग फिरताना दिसून येत आहे.

गुलाबी बोंड अळी कशी ओळखावी?

आता यामध्ये मादी पतंग कपाशीचे पाते, फुले, बोंड यावर अंडी घालतात. यामुळे पुढील काळात कपाशीत गुलाबी बोंड आळी वाढू शकते. यांनी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तुम्हाला टाळायचे असेल किंवा संपवायचं असेल तर त्याला काय करायचे ?.

यात सर्वात उपाय म्हणजेच कपाशीचे नीट निरीक्षण करून गुलाबी बोंड अळी असलेल्या डोमकळ्या तोडून घ्यायचे. डोमकळ्या जाळून किंवा जमिनीत पूर्ण नष्ट करायच्या आहेत. त्यामुळे गुलाबी बोंड अळीला मोठ्या प्रमाणात कंट्रोल करता येते, किंवा नियंत्रण करता येतं.

गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी किती कामगंध सापळे लावावी ?

गुलाबी बोंड अळी साठीचे कामगंध सापळे हेक्टरी 05 या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावा. आणि जास्त प्रमाणात पतंग असतील तर सोपा उपाय यासाठी आहे तो म्हणजे सापळेची एकरी संख्या वाढवायची म्हणजे 1 एकर क्षेत्रात आठ ते दहा कामगंध सापळे लावायचे आहेत.

गुलाबी बोंड अळीचे जैविक नियंत्रण उपाय?

टायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटक हे आहे. हे गांधीलमाशी सारखे परोपजीवी कीटक बोड अळी फस्त करते. म्हणून याला ट्रायकोग्रामा फॅक्टरी परोपजीवी किटकाचे ट्रायकोकार्ड एकरी दोन ते तीन या प्रमाणात लावायचे. यात महत्त्वाचं टायकोकार्ड पीक 60 दिवसाचे झाल्यावर 2 वेळा लावायचे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी दहा दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची नाही हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर कीटकनाशकामुळे टायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटक ही नष्ट होतात, हे ट्रायकोकार्ड हे विभागाच्या कृषी विद्यापीठातून मिळू शकतील.

📑 हे पण वाचा :- शेतातील पिकावर तणनाशक फवारल्या गेले किंवा स्प्रे पंप तणनाशकचा होता मग हे रामबाण उपाय लगेच करा

गुलाबी बोंड अळी रोखण्याचे उपाय कोणते ?

बोंड अळीला रोखण्याचा तिसरा सोपा उपाय म्हणजे पक्षी थांबे लावणे.

  • कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी ही एकरी किमान 25 पक्षी थांबेल लावायचे आहेत.
  • 5 टक्के निंबोळी अर्क किंवा Azadirachtin हे 1500
  • पीपीएम 500 मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना
  • या बुरशी युक्त जैविक कीटकनाशकांची जमिनीत ओल व हवेत आद्रता असताना 800 ग्राम प्रति एकर प्रमाणात फवारणी करून घ्यायची आहे.

गुलाबी बोंड अळी माहिती मराठी

अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी आतापासून खबरदारी घेऊन नियंत्रण करता येते. सदरील अपडेट हे माहिती आणि संशोधन- कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्याकडून ही माहिती आहे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपला वेबसाईट ला पुन्हा भेट देत रहा धन्यवाद.

📢 सूचना :- ही माहिती कृषी विद्यापीठ व विविध ठिकाणावरून ही माहिती संकलन करून तुम्हाला दिली आहेत. कोणता ही वरील प्रयोग करण्यापूर्वी कृषी सेवक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून किंवा माहिती घेऊन प्रयोग करावे. ही वेबसाईट व लेखक नुकसानीची हमी घेत नाही धन्यवाद.

Leave a Comment