pik vima yojana :- खरीप २०२० पिकविम्याचे मा.सर्वोच्च न्यायलयात जमा असलेले २०० कोटी रुपये व त्यावरी व्याज १.३४ कोटी रुपये असे एकूण २०१.३४ कोटी रुपयांचा धनाकर्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांच्या नावे आज प्राप्त झाला आहे तसेच केंद्र व राज्य सरकारकडे दुसऱ्या हप्त्यापोटी बाकी असलेले अंदाजे २०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात उपलब्ध करून घेण्याबाबत पत्र देण्यात आले आहे..
pik vima yojana
आपल्या विनंतीवरून, मा.सर्वोच्च न्यायालयात जमा असलेल्या रकमेचा धनाकर्ष प्राप्तीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.तिर्थकर मागील आठवडाभर दिल्लीत ठाण मांडून होते.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे पिक नुकसानीची विमा भरपाई जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वर्ग करण्यात येत आहे! वसूबारसेच्या पुर्वसंध्येला धाराशिवकरांसाठी ही आणखीन एक आनंददायी बाब आहे. उद्या हा धनाकर्ष खात्यावर जमा करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा प्रयत्न आहे.