Monkeypox Virus in India | कोरोना नंतर पुन्हा मंकीपॉक्स मोठ संकट भयंकर Virus

Monkeypox Virus in India :- कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचा धोका वाढला आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्सचे ९२ रुग्ण आढळून आले आहेत. हे सगळे रुग्ण ब्रिटन, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील आहेत.

सध्याला एकूण १२ देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आहेत. मंकीपॉक्सचा फैलाव न झालेल्या देशांमध्ये अधिक रुग्ण आढळून येऊ शकतात. असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

Monkeypox Virus in India

मंकीपॉक्सवर उपचार काय ? :- मंकीपॉक्सची लागण झालेल्यांना कांजण्यांवरील लस दिली जाते. ही लस आतापर्यंत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. यासोबतच शास्त्रज्ञ अँटीव्हायरल औषध तयार करण्याचं काम करत आहेत.

मंकीपॉक्सचा धोका अधिक असलेल्यांना कांजण्यांवरील लस देण्यात यावी, अशी शिफारस युरोपियन सेंटर फॉर डिजीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलनं केली आहे.

मंकीपॉक्स महाराष्ट सरकार 

  1. गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
  2. या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  3. अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
  4. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.
  5. रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
  6. गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.
  7. जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही,
  8. तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे. 

मंकीपॉक्सची लक्षणं काय? 

(monkeypox virus symptoms) तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

कसा वाढतो संसर्गाचा धोका?

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.

तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment