50 Hajar Protshan Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना आणि अतिवृष्टी तसेच महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना. सुद्धा 50000 हजार प्रोत्साहन ही मिळणार आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा एकदा मंजुरी देण्यात आलेली आहे.
त्यामध्ये किती शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे ?. याबाबत संपूर्ण माहिती तसेच यासाठी पात्रता अटी, शर्ती काय आहेत ?. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय याविषयी सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा.
50 Hajar Protshan Yojana
राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख. कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसालासुद्धा हा लाभ मिळेल.
नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017 – 18, 2018 – 19 आणि 2019 – 20 हा कालावधी विचारात घेऊन. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली. 2017 – 18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास.
हेही वाचा; कुकुटपालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर
50 हजार प्रोत्साहन अनुदान
2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले. असल्यास अथवा 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक. कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास. अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, 2018 – 19 अथवा 2019 – 20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णत.
हेही वाचा; कापूस पिकांचे Top 10 बियाणे पहा माहिती येथे क्लिक करून
कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना
परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018 – 19 अथवा 2019 – 20 या वर्षात. प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
हेही वाचा; अमृत कापूस लागवड एकरी 50 क्विंटल कापूस यशस्वी यशोगाथा पहा माहिती
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 200 गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :– येथे पहा माहिती