Pik Vima Nanded Manjur | प्रधानमंत्री पीक विमा

Pik Vima Nanded Manjur :- नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केली.

या अधिसुचनेद्वारे सर्व महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात 25 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येते. त्याअनुषंगाने आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार.

नमूद पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. यामुळे नांदेड जिल्ह्यास जवळपास 400 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.