Pik Spardha Yojana Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार रुपये मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना ही मिळणार आहेत. काय ही नेमकी योजना आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राज्य सरकार राबवत असतो. अशातच राज्यातील शेतकऱ्यांना वेगळे प्रयोगासाठी प्रोग्रेस करायला आणि त्याचबरोबर पिकांचे चांगले उत्पादन घ्यावे.
Pik Spardha Yojana Maharashtra
महाराष्ट्र कृषी विभागाच्या माध्यमातून पीक स्पर्धेचं आयोजन हे केलं जात आहे. या स्पर्धेत चांगले उत्पादन मिळेल अशा शेतकऱ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळत असते. शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा आणि त्यात उत्पादन जो आधिक घेतील.
या स्पर्धेच्या माध्यमातून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरावर, आणि जिल्हास्तरावर पुरस्काराचे वितरण केले जात आहे. आणि यामध्ये आता रोग रक्कम म्हणून पुरस्कार दिला जातो. सोलापूर जिल्ह्यात पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पिक स्पर्धा योजना महाराष्ट्र
जिल्हाधिकारी महोदय बाळासाहेब शिंदे यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना भाग घेण्याची आव्हान केले आहे. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी स्पर्धा आयोजित केली जाते. आता रब्बी हंगाम सुरू असून गहू, हरभरा, करडई, जवस,
ज्वारी या 5 पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तरी पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2022 ही ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय.
किती मिळणार बक्षीस व कसे ?
तृतीय असे विजेते निवडले जाणार आहे. आणि त्यांना आता ही रक्कम दिली जाणार आहे, तर हे बक्षीस कसं राहणार आहे बक्षीस असे स्वरूप काय आहेत पाहुयात. या पीक स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीयाचे तीन विजेते निवडले जातील.
तालुका पातळीवर सर्वसाधारण आदिवासी विकासगटासाठी पहिले बक्षीस 5 हजार रुपये, दुसरे बक्षीस 3 हजार रुपये. तिसरे बक्षीस 3 हजार रुपये असणार आहेत. आणि जिल्हा पातळी सर्वसाधारण आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस 10 हजार रुपये.
हेही वाचा, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी जाहीर येथे पहा
शेतकरी बक्षीस योजना
दुसरे बक्षीस 7000 रुपये, तिसरे बक्षीस 5000 रुपये असे असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण आदिवासी गटांसाठी पहिले बक्षीस 50000 रुपये, आणि दुसरे बक्षीस 40 हजार रुपये, तिसरे बक्षीस 30 हजार रुपये असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील असेल तर या पीक स्पर्धेचा लाभ घेऊ शकता. आता अशा प्रकारे लाभार्थ्यांना या पीक स्पर्धेतून लाभ घेता येऊ शकतो.
पिक स्पर्धा योजना फायदे ?
5 हजार रुपये पासून ते 50 हजार पर्यंत या तालुका, जिल्हा, आणि राज्यस्तरीय योजनेमध्ये बक्षीस स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अशाप्रकारे आपण याचा लाभ घेऊ शकता. सोलापूर जिल्ह्यासाठी ही अपडेट सध्या सुरू आहेत. 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्यास मुदत आपल्याला देण्यात आलेले आहे.
हेही वाचा, आता आपल्या शेत जमिनीचा नकाशा पहा मोबाईलवरून पहा येथे
📢 नवीन कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजनाचे ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती